व्हीएस न्युज - वाकड येथील एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भारताचा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.शाळेत प्रजासत्ताक दिना निम्मित भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध कलाकृती आणि सांस्कृतिक कार्यक्रम उत्कृष्टपणे सदर केले.विद्यार्थ्यांनी भाषणे करून क्रांतिकारकांना आदरांजली व्यक्त केली.
यावेळी ॲड. दीप्ती देशपांडे यांनी ध्वजारोहण करण्याची आणि प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची संधी दिली म्हणून शाळेचे आभार व्यक्त केले. या वेळी विद्यार्थांना संबोधित करीत त्या म्हणाल्या की "दर वर्षी जानेवारी महिन्याच्या २६ तारखेला भारताचा ‘प्रजासत्ताक दिन’ साजरा केला जतो. भारत देश १५ ऑगष्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. पण त्याची लोकशाही राज्य घटना २६ जानेवारी १९५० रोजी अमलात आली. म्हणून हा ‘प्रजासत्ताक दिन म्हणून मानला जातो.आपला भारत हा एक लोकशाही राष्ट्र आहे म्हणजे हे लोकांचे, लोकांनी,लोकांसाठी चालविलेले राष्ट्र आहे. हा अधिकार भारताच्या घटनेनुसार २६ जानेवारी १९५० साली मिळाला. त्यादिवसापासून प्रजेची सत्ता सुरु झाली." पुढे त्यांनी विद्यार्थ्यांना भारतीय राज्यघटना आणि त्यातील नागरिकांचे मूलभूत हक्क या वर मार्गदर्शन केले.
यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण हक्क कायद्याबद्दल माहिती दिली आणि शिक्षणामुळेच आपण आवश्यक कौशल्ये, ज्ञान, मुल्ये आणि जीवनविषयक दृष्टीकोन आत्मसात करून सक्षम होतो’, असे प्रतिपादन करत शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले.
शाळेचे संस्थापक श्री अंकुश बोडके आणि मुख्याध्यापिका आरतारे मॅडम यांनी शिक्षणाच्या नव्या दृष्टीनुसार अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला साह्य करणाऱ्या समग्र अनुभवसंहतीचा समावेश केला आहे. त्यामुळे अभ्यासेतर समजल्या जाणाऱ्या क्रीडा, वक्तृत्व, नाट्य आदी कार्यक्रमांचा अभ्यासक्रमात समावेश होत आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच विविध कलागुणांना प्रोत्साहन देऊन त्यांना त्यात निपुण केले आहे.यामुळे ॲड. दीप्ती देशपांडे यांनी शाळेच्या संस्थापक , मुख्याध्यापिका आणि शिक्षकांचे कौतुक केले.
यावेळी शाळेतील सर्व शिक्षक आणि शाळेतील इतर स्टाफ उपस्थित होता.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002