व्हीएस न्यूज - नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करु असे आश्वासन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी कॉंग्रेसच्या शिष्ट मंडळास दिले. पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसच्या शिष्ट मंडळाची शुक्रवारी आयुक्त पाटील यांच्या समवेत बैठक झाली.
या बैठकीत अधिका-यांसह माजी महापौर कविचंद भाट, शिक्षण मंडळाचे माजी सभापती अभिमन्यु दहितुले, महिला नेत्या निगार बारस्कर, युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, महिला शहराध्यक्षा सायली नढे, कॉंग्रेस सेवादलाचे शहराध्यक्ष विरेन्द्र गायकवाड, पिंपरी विधानसभा कॉंग्रेस अध्यक्ष विश्वनाथ जगताप, चिंचवड विधानसभा कॉंग्रेसचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मलशेट्टी, युवक उपाध्यक्ष सौरभ शिंदे, युवक कॉंग्रेसचे पिंपरी विधानसभा अध्यक्ष हिराचंद जाधव, अर्जुन लांडगे, प्रा. किरण खाजेकर, शशी नायर, सुनील राऊत, के. हरिनारायण, इस्माईल संगम, दिनकर भालेकर, अनिता अधिकारी, छायाताई देसले, अॅड. उमेश खंदारे, डॉ. मनिषा गरुड, किरण नढे, स्वाती शिंदे, आबा खराडे, करण गील, हरिश डोळस, डॉ. सुनिता पुलावळे, निर्मला खैरे, विजय ओव्हाळ, आशा भोसले, जुबेर खान, विश्वनाथ गजरमल, बाबा बनसोडे आदींचा समावेश करण्यात आला.
नाशिक फाटा चौकातील वाहतूक सुरळीत व्हावी आणि नाशिक रोड वरुन पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, वाकड - हिंजवडीकडे नागरिकांना प्रवास करणे सुरळीत व्हावे यासाठी नाशिक फाटा चौकात दुमजली उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. या पुलाचे काम पुर्ण होऊन अनेक वर्ष झाले तरीही पिंपळे गुरव वरुन पुण्याकडे जाण्यासाठी करण्यात आलेला रॅम्प मागील चार वर्षांपासून बंद आहे त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. हा रॅम्प सुरु करावा यासाठी अशी मागणी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली होती.
यानंतर आयुक्त राजेश पाटील यांनी वाहतूक विभाग, बीआरटीएस विभाग आणि मेट्रो विभागाच्या अधिका-यांशी कॉंग्रेसच्या शिष्टमंडळ समवेत शुक्रवारी बैठक घेतली. या बैठकीत डॉ. कदम यांनी या चौकातील वाहतूकीबाबत तक्रार केली. यावेळी आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले की, मे २०१७ पासून नाशिक फाटा चौकात मेट्रो व मेट्रो स्टेशन काम सुरु आहे.
६ मार्च रोजी वल्लभ नगर मेट्रो स्टेशन ते फुगेवाडी मेट्रो स्टेशन पर्यंतची मेट्रोची सेवा सुरु करण्याचे नियोजन आहे. आगामी पंधरा दिवसात या चौकातील रॅम्प सुरु करणे शक्य होईल असे आश्वासन आयुक्त राजेश पाटील यांनी दिले अशी माहिती कॉंग्रेसच्या वतीने प्रसिध्दीस देण्यात आली आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002