व्हीएस न्युज - थेरगाव परिसरात राहणारे राहुल सरवदे ह गेल्या तीन वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी केसदान हा उपक्रम राबवित आहेत. राहुल सरवदे हे थेरगाव येथील पदमजी पेपर प्रॉडक्ट्स या कंपनीत कार्यरत आहेत. तसेच ते परिवर्तन सोशल फाऊंडेशन आणि थेरगाव सोशल फाऊंडेशन या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून समाजकार्यात सक्रीय असतात. त्यांनी पहिल्यांदा २७ जुलै २०१९ रोजी केसदान केले. त्यानंतर ११ फेब्रुवारी २०२२ आणि आता पुन्हा एकदा केसदान केले आहे.
मुंबई येथील टाटा हॉस्पिटल संलग्न मदत ट्रस्ट या संस्थेकडून दान मिळालेल्या केसांचे विग बनवले जातात. हे विग कर्करोगामुळे केस गेलेल्या रुग्णांना दिले जातात. कर्करोगाशी उपचार पद्धती असलेल्या केमोथेरपीमध्ये रुग्णाच्या डोक्यावरील सर्व केस गळून जातात. त्यामुळे अनेक रुग्णांचे मानसिक खच्चीकरण होते. त्यांना मानसिक बळ मिळण्यासाठी मदत ट्रस्टने केलेले विग त्या आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना दिले जातात.
केसदान या उपक्रमाबाबत व्यक्त होताना राहुल सरवदे म्हणतात, “केसदान आणि इतर सामाजिक कार्य करत असताना मला माझे कुटुंबीय व सहकारी मित्र परिवार यांचा खूप मोठा पाठिंबा मिळाला. आजवर मी ४५ पेक्षा जास्त वेळा रक्तदान केले असून तीन वेळा केसदान केले आहे.तसेच यापूढे देखील आपल्या समाजसाठी काहीतरी चांगले करण्यासाठी मी नेहमीच अविरतपणे प्रयत्नशिल राहील.”
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002