व्हीएस न्युज - रिक्षा चालकांच्या प्रश्नासाठी आज रोजी पुणे शहरातील सर्व संघटना एकत्र आल्या जवळपास २५ हजार रिक्षा चालक आणि मालकांनी पुणे आरटीओ वरती भव्य मोर्चा काढला आणि तीव्र आंदोलन करण्यात आले,
ट्रान्सपोर्ट कमिटीमध्ये ओला उबेर मधील टू व्हीलर बंद करण्याचा ठराव पारित करून या वरती ताबडतोब बंदी आणून ओला उबेर मधून टू व्हीलर बुकिंग केले जाणार नाही याची व्यवस्था केली जाईल,पुणे सायबर क्राईम ब्रँच यांच्यासोबत विभागाची बैठक सुरू असून कायदेशीर कारवाई करण्याच्या अनुषंगाने टू व्हीलर वाहतुकीबद्दल गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून याबाबत तपास सुरू आहे, मुक्त परवाना बंद करण्यासाठी केंद्र सरकारला प्रस्ताव सादर केला असून लवकरच मुक्त परवाना बंद होईल,असे आश्वासन पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी यावेळी दिले,
येत्या दोन दिवसात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यास पुन्हा एकदा तीव्र आंदोलन करून लाखोच्या संख्येने एकत्र येऊन चक्काजाम करू असा इशारा देखील यावेळी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिला
महाराष्ट्र रिक्षा पंचायत बाबासाहेब कांबळे ,महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना किशोर चिंतामणी ,आम आदमी रिक्षा संघटना, श्रीकांत आचार्य सल्लागार ,संजय कवडे
पुणे शहर जिल्हा वाहतूक सेवा संघटना, अंकुश नवले भाजपा वाहतूक आघाडी, फारुख बागवाले आशीर्वाद रिक्षा संघटना,अजिंक्य रिक्षा संघटना नितीन भुजबळ आदी प्रमुख संघटनांनी यावेळी एकत्रित येऊन आंदोलन केले,
याप्रमाणे अंदाजे 22 रिक्षा संघटनांचा पाठिंबा मिळाला व या संघटना देखील सहभागी झाल्या होत्या अशी माहिती बाबा कांबळे यांनी दिली.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002