पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे .
पिंपरी चिंचवड
2022-03-09
व्हीएस न्यूज - "दिलेल्या लिंकवर तुमचा पॅनकार्ड अपडेट करा, तुमचं SBI बँकेचे नेट बँकिंग सस्पेंड होणार आहे" असे भासवून लिंक वर क्लिक करण्यास भाग पाडून एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा घातला. सदरची घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे.या प्रकरणी अशोक विठ्ठलराव मडावी (वय- ५०) यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना एका मोबाईल नंबरवरून SBI बँकेचे नेट बँकिंग सस्पेंड होणार आहे. तुमचं पॅनकार्ड अपडेट करा अशा आशयाचा इंग्रजीत टेक्स्ट मॅसेज आला. त्यात एक लिंक दिलेली होती. शहानिशा न करता त्यावर क्लिक करून तक्रारदार यांनी पॅनकार्ड अपडेट केले तसेच माहिती आणि ओटीपी भरून दिला. काही सेकंदातच त्यांच्या SBI बँक खात्यातून ४ लाख ९५ हजार रुपये कमी झाल्याचा मॅसेज आला. आपली फसवणूक झाल्याचं समजताच अशोक विठ्ठल मडावी यांनी भोसरी पोलिसात तक्रार दिली आहे.