व्हिएस न्यूज - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेेतिल स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन ज्ञानेश्वर लांडगे आणि त्यांचे स्विय सहाय्यक व मुख्य लिपिक ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे ,विजय शंभुलाल चावरिया ( पद - लिपिक) , राजेंद्र जयवंतराव शिंदे ( पद - संगणक चालक ) , अरविंद भीमराव कांबळे ( पद - शिपाई) यांना १ लाख अठरा हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दि. १८ रोजी ताब्यात घेतले होते.
याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पिंपरी पालिकेत छापा घातला. त्यावेळी स्थायी समिती अध्यक्षाच्या स्वीय सहायकाच्या केबिनमध्ये ८ लाखांहून अधिक बेकायदा रक्कम आढळून आली आहे. या कारवाईनंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने तातडीने अध्यक्ष लांडगे आणि स्वीय सहायक यांच्या घरावर छापे घातले असून ही झडतीची कारवाई पहाटेपर्यंत सुरू होती.याप्रकरणी स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे .
ज्या पाच जणांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक केली होती .त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आलं होत त्यावेळी नितीन लांडगे यांना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या धाडे मुळे शहरात मोठी खळबळ माजली असून यामुळे राजकीय क्षेत्रात भीतीचे वातावरण पसरलं आहे .आणखी दिग्गज नगरसेवकांची नावे पुढे येणार असल्याच्या चर्चा राजकीय क्षेत्रामध्ये सुरु आहेत.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002