व्हिएस न्यूज - "कौशल्य प्रशिक्षण हे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मोठया प्रमाणावर काम करते, या लोकांकडे नीट लक्ष देऊन त्यांना कौशल्य प्रशिक्षण दिले तर ते सुद्धा चांगले आयुष्य जगू शकतात, असे विचार मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका मुक्ता अवचट पुणतांबेकर यांनी व्यक्त केले. सिंबायोसिस ओपन एजुकेशन सोसायटीचा 18 वा स्थापना दिन, सिंबायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निगची सिल्वर जुबली आणि सिंबायोसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी किवळेच्या नवव्या वर्धापनदिनानिमित्त किवळे येथील सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या ऑडिटोरियम मध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सिंबायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ शा. ब. मुजुमदार हे होते. तसेच सिंबायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटीच्या प्रिन्सिपल डायरेक्टर डॉ. स्वाती मुजुमदार या उपस्थीत होत्या.
यावेळी एससीडीएलच्या सिल्वर जुबली लोगोचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मुक्ता अवचट पुणतांबेकर म्हणाल्या, सिंबायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निग हे कौशल्य प्रशिक्षण देऊन अनेक युवकांच्या आयुष्यात खूप मोलाचा बदल करत आहे. कौशल्य प्रशिक्षण घेऊन त्यांची आर्थिक परिथिती सुधारून सुंदर आयुष्य जगात आहेत."
डॉ. स्वाती मुजुमदार म्हणाल्या, “तळागाळातील लोकांना आम्ही कौशल्य प्रशिक्षण देत आहोत, हे प्रशिक्षण देताना व्यवसाय व बाजारातील मागणी चे भान ठेवले आहे आणि त्यानुसार प्रशिक्षण देत आहोत. दुर्गम भागात शिक्षण पोहचवण्या करतात ऑनलाईन लर्निग हे महत्वाचे ठरत आहे. सिंबायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निगला झालेली २५ वर्ष यात अतिशय मोलाची भूमिका बजावतात. पुढील पाच वर्षात नवीन दिशा घेण्याची गरज आहे. 'एजुकेशन ऑन डिमांड' - शिक्षणा बरोबर अधिक कौशल्य प्रशिक्षणाची गरज आहे. सिंबायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निग मध्ये आता आपण सर्टिफिकेट आणि डिप्लोमा देत आहोत पण पुढील दोन वर्षात याचे ओपन युनिव्हर्सिटी मध्ये परिवर्तन करून मुलांना डिप्लोमा न देता डिग्री दिली जाईल असा माझा भविष्यासाठीचा मानस आहे".
शा. ब. मुजुमदार म्हणाले," एससीडीएल सोबत खूप लोक जोडली गेली आहेत आणि त्यात आमचे कर्मचारी अतिशय महत्वाची भूमिका बजावतात. २५ वर्ष हा काही सोपा प्रवास नाही. हि भाग्याची गोष्ट आहे. आमच्या सोबत येणाऱ्या बऱ्याच लोकांनी सुचवलेल्या गोष्टी करत गेलो आणि त्याला लोकांनी खूप मोठा प्रतिसाद दिला, पाहता पाहता विद्यार्थी संख्या २ लाख पर्यंत गेली. प्रत्येक शिक्षण संस्थेकडे सांगण्यासाठी स्वतःचा आपला प्रवास असतो. आमचा हा प्रवास स्पष्ट दूर दृष्टी पासून सुरु झाला, समाजातील या बदलांन प्रमाणे आपण बदलणे गरजेचे आहे." यावेळी त्यांनी अनिल अवचट यांच्या आठवणींना देखल उजाळा दिला.
कार्क्रमात निखिलेश कुलकर्णी, योगेश जोशी, हेमंत सेठिया, अतुल उपाध्याय या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच गायत्री पिल्लई, दिलीप शर्मा, ऋतुपर्ण मुखर्जी, नमिता कडू, मधुरा जोशी, ज्योतीका कोळतकर, यश केंजाळे या उतुंग यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा हि या वेळी सत्कार करण्यात आला. २५ वर्ष व अधिक वर्षांपासून जोडलेल्या कर्मचाऱ्यांचा हि या वेळी सत्कार करण्यात आला, या मध्ये रजिस्टार कुंभार, नूतन गोरे, सुनील धुमाळ, रवींद्र शेलार, भास्कर निकम हे होते. १० वर्ष व अधिक कर्मचाऱ्यांनमध्ये सुहास भोसले, पदंप्रिया इरावती, यांचा सत्कार करण्यात आला. १५ वर्ष व अधिक कर्मचाऱ्यांनमध्ये आमला किरण जोशी यांचा सत्कार करण्यात आला. ३० वर्ष व अधिक कर्मचाऱ्यांनमध्ये प्रदीप डोळस, प्रमोद भोसले, शोभा अमोल यांचा सत्कार करण्यात आला. पुढील कार्यक्रमात एससीडीएल इमारतीच्या मिनिएचरचा केक कापण्यात आला.
या वेळी कर्मचाऱ्यांनी आयोजित केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थितानी भरभरून प्रतिसाद दिला. शालिनी नायर यांनी सूत्रसंचालन केले. निवृत्त मेजर सोनाली कदम यांनी यांनी आभार मानले.
व्हिएस न्यूज - भोसरी भगत वस्ती येथे (दि.२९) शिवयोगी सभागृहात भगवान परशुराम जयंती उत्सव आयोजित करण्यात आला. या निमित्त उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.तसेच दिपप्रज्वलन करुन श्री भगवान परशुरामाच्या प्रतिमाचे पुजन केले वेदमूर्ती महेश कुलकर्णी, ऋषिकेश कुलकर्णी, नागेश वैद्य यांनी मंञघोष करुन व सर्व उपस्थितांनी केलेल्या भगवान परशुरामाच्या जयघोषात परिसर मंत्रमुग्ध झाला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम भगवान जय परशुराम सेवा समिती च्या सर्व सदस्य सभासदांनी घेतले तसेच उपस्थित मान्यवर भोसरी ग्रामउपाद्या माधव तिखे गुरुजी, शशिकांत कुलकर्णी गुरुजी,महेश जोशी गुरुजी ,आखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे सदस्य प्रविण कुरबेट,हनुमंत रामदासी, दिपक भास्कर, रोहित वैद्य, संदिप वैद्य, संदिप कुलकर्णी, तात्यासाहेब कुलकर्णी, शेंडे गुरुजी, चिन्मय पाठक, प्रकाश कुलकर्णी, शिवाजी डांगे, सिध्दांत चौधरी तसेच महिला भगिनी ज्योतिर्भास्कराचार्या मंजुषा जोशी कुलकर्णी, विजयालक्ष्मी डांगे, ज्योती कुलकर्णी, धनश्री कुलकर्णी, स्नेहल कुलकर्णी, सिमा कुलकर्णी अणि इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
आभार ज्योतिषाचार्य महेश जोशी यांनी मानले.
व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड पिंपळे सौदागर येथे डिजिटल मीडिया पिंपरी चिंचवड शहर तर्फे नवीन सदस्य नोंदणी व संघटनेच्या बळकटी करणासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. इलेक्ट्रॉनिक माध्यम व प्रिंट मीडिया माध्यमातून असणाऱ्या पत्रकार संघप्रमाणे डिजिटल माध्यमानाही महत्व असून या माध्यमातून लोकशाहीचा एक महत्वाचा अंग म्हणून बघण्यात येते या अनुषंगाने डिजिटल मीडिया पिंपरी चिंचवड शहराचे नवनिर्वाचित अध्यक्ष विनय सोनवणे यांनी नवीन सदस्य नोंदणी व डिजिटल मीडिया माध्यमातून सदस्य व इतरांचे बळकटीकरण करण्यासाठी सर्वानी एकत्र येऊन काम करण्यासाठी या सभेचे आयोजन केले होते.
यावेळी नवीन दहा विविध माध्यमाचे प्रतिनिधी यांचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली. नवीन सदस्यांचे यावेळी अध्यक्ष विनय सोनवणे, पत्रकार संघ पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष अनिल वडघुले यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. यावेळी डिजिटल माध्यमानी एकत्र येऊन कार्य करावे व सर्वानी संघांचे हित जोपासून काम करावे असे अध्यक्ष विनय सोनवणे यांनी अधोरेखित केले. यावेळी मोठया संख्येने डिजिटल मीडिया माध्यमाचे प्रतिनिधी उपस्थित होते. पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष गणेश मोकाशी यांच्या अध्यक्षतेखाली नवीन सदस्य नोंदणी संपन्न झाली यावेळी सचिव सागर सूर्यवंशी उपस्थित होते.
मराठी पत्रकार परिषद मुंबई चे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख साहेबांच्या संघटनात्मक धेय्य धोरणांना अनुसरून आणि विश्वस्त शरद पाबळे, अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर डिजिटल मिडिया परिषद राज्य अध्यक्ष अनिल वाघमारे, जिल्हा अध्यक्ष सुनील लोणकर यांच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून पत्रकारांना संघटनेचे सदस्य करून घतले अनंता इनगळे, संदीप दुसाने, सुनील गायकवाड, संभाजी बारबोले, राहुल जाधव, अमर चाकोतकर, योगेश वडमारे, भाऊसाहेब निकम, प्रियांका गायकवाड आणि सचिन पाटील हे पत्रकार पिंपरी चिंचवड पत्रकार संघ व पिंपरी चिंचवड डिजिटल मिडिया परिषदे सदस्य झाले.
व्हीएस न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार अजित दामोदर गव्हाणे यांना पाठिंबा जाहीर केला आहे, आमदार म्हणुन त्यांना विधानभवनात पाठवु आसा विश्वास छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.महायुती सरकार मराठा आरक्षण,धणगर आरक्षणाचा विषय सोडवला नाही आणि शेतकऱ्यांची कर्ज माफ केली नाहीत ,तसेच महाराष्ट्रातील अनेक मोठे प्रकल्प गुजरातला गेले, त्यांनाही महायुतीचे सरकार रोखू शकले नाहीत, त्याचप्रमाणे छावा संघटनेचे विध्यार्थी आघाडी चे प्रदेशाध्यक्ष व शेतकऱ्यांचे नेते विजय कुमार घाडगे पाटील हे तब्बल पंधरा दिवस सोयाबीनला आठ हजार भाव मिळावा यासाठी उपोषणाला बसले होते,याची दखल सरकारने घेतली नाही हे सरकार शेतकरी, कामगार, मराठा व धनगर समाजाला न्याय देऊ शकले नाही म्हणून परिवर्तन होण्याची आणि सरकार बदलायची वेळ आली आहे. यासाठी आखिल भारतीय छावा संघटनेने एक संस्कृत व सुशिक्षित उमेदवार अजित गव्हाणे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
यावेळी आखिल भारतीय छावा संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मच्छिंद्र चिंचोळे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सचिन लिमकर, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष राम सुर्यवंशी पुणे जिल्हा अध्यक्ष अक्षय बोडके, पुणे जिल्हा अध्यक्ष शिक्षक आघाडी प्रशांत फड,पुणे जिल्हा कार्याध्यक्ष गणेश जाधव,पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष संजय कांबळे, पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष राजेंद्र राऊत, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सोसल मिडिया शुभम बिरादार, कुणाल शिंदे,व आदि कार्येकर्ते उपस्थित होते.
व्हीएस न्यूज - पिंपरी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवार सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या सभेत खासदार अमोल कोल्हे उपस्थित होते. चुकीला एक वेळ माफी असू शकते परंतु गद्दारीला माफी नाही ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर गद्दारी केली त्यांना माफ केले जाणार नाही असे उद्गार शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी काढले.
यावेळी अमोल कोल्हे म्हणाले की सुलक्षणा शीलवंत या वाघीण आहेत. ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अडचणीत होता त्यावेळी भले भले मागे हटत होते परंतु ही वाघीण मैदानात उतरली. रवींद्रनाथ टागोर यांच्या एका कवितेचा दाखला देत अमोल कोल्हे म्हणाले की सूर्य अस्ताला जात असताना प्रकाशाचे काय असा प्रश्न सूर्याला पडला होता त्यावेळी एक पंती पुढे आली व तिने अंधार दूर करता येतो हा विश्वास जगाला दिला त्याचप्रमाणे सुलक्षणा शीलवंत या विश्वास देणाऱ्या उमेदवार असल्याने आपले सर्वस्व पणाला लावून आपण त्यांना विजयी करावयाचे आहे.
यावेळी बोलताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे म्हणाले की शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणाऱ्या एक उच्चशिक्षित उमेदवार आपल्याला मिळाले आहेत हे आपले भाग्य आहे. बदलापूर येथे घडलेल्या घटनेनंतर निघालेल्या मोर्चाचे नेतृत्व सुलक्षणा शीलवंत यांनी केले तसेच मणिपूर मधील महिला अत्याचाराच्या विरोधात निघालेल्या मोर्चाचे नेतृत्व देखील सुलक्षणाशीलवंत यांनी केले त्याचवेळी महिलांच्या हक्कांसाठी व अधिकारासाठी सातत्यपूर्ण लढण्याची तयारी असलेले हे नेतृत्व आहे हे लक्षात आले होते. पिंपरी चिंचवड शहरातील प्रश्नांची जाण असलेल्या उमेदवार सुलक्षणाशीलवंत असल्याने त्यांना निवडून देण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
आज कार्यकर्त्यांचा प्रचंड जल्लोष मतदारांचा उत्साह आणि प्रेमाच्या वर्षावात पिंपरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाच्या उमेदवार सुलक्षणा शीलवंत यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सुलक्षणा शीलवंत यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ची रॅली विजय निर्धाराची रॅली ठरली होती. यावेळी कार्यकर्ते दुचाकी व चार चाकी गाड्यांमधून महेश नगर, संत तुकाराम नगर येथून निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयापर्यंत आले होते. सुलक्षणा शीलवंत यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून कार्यकर्त्यांच्यात व मतदारांच्यात उत्साह व चैतन्य निर्माण झाले आहे हा उत्साह आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघालेल्या रॅलीतही दिसून आला. सुरुवातीला पिंपरी चौकात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून प्रचंड घोषणा देत कार्यकर्ते निवडणूक आयुक्तांच्या कार्यालयापर्यंत आले होते.
रॅलीतील कार्यकर्त्यांच्या हातात शरद पवार साहेब, हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे, आपचे प्रमुख व दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तसेच उमेदवार सुलक्षणा शीलवंत यांच्या प्रतिमा हातात घेऊन दिमाखात सहभागी झाले होते.
सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज भरताना शिरूरचे खासदार डॉ अमोल कोल्हे पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे,माजी नगरसेवक शंकर पांढरकर,आप पक्षाच्या शहराध्यक्ष मीनाताई जावळे, चंद्रमनी जावळे,सुनील मोरे,सूरज मोरे,शरद जाधव,युवक अध्यक्ष इम्रान शेख,वरिष्ठ उपाध्यक्ष धम्मराज साळवे ,चिंचवड विधानसभा अध्यक्ष सागर चिंचवडे,नेते इखलास सय्यद,कार्याध्यक्ष विशाल काळभोर कार्याध्यक्ष संतोष कवडे ,ज्ञानेश आल्हाट,श्रीमंत जगताप ,दिलीप पानसरे ,जिब्राईल शेख ,संदीप चव्हाण,अनिल भोसले,योगेश सोनवणे,महेश पानस्कर,गिरीश कुटे, अतुल शितोळे,गोविंद अप्पा काळभोर,आपुलकी जेष्ठ नागरिक संघ,वसंत सोनार,फैज शेख,तृप्ती निंबळे,सागर लष्करे,अमोल गाडेकर,चेतन शेटे सूर्यवंशी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे adv अमीन शेख,अण्णा कुऱ्हाडे, राहुल आहेर,संदीप गायकवाड ,कैलास बनसोडे, संदेश जगताप,राजेंद्र जगताप,हेमंत बलकवडे, श्रीकांत पवार उपस्थित होते.
व्हीएस न्यूज - राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने लोकाभिमुख निर्णय घेतले आहेत. त्यामुळे विकासात्मक मुद्दे घेऊन विधानसभा निवडणुकीला महायुती एकजुटीने सामोरे जात आहे. जनता महायुतीच्या मागे आहे. पिंपरी चिंचवड शहरासाठी मेट्रो, पाणी, रस्ते असे अनेक प्रश्न महायुतीने मिटवले आहेत. आम्ही सर्वजण एकत्र असून एकदिलाने निवडणुका लढून जिंकणार असल्याचा निर्धार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
महायुती व इतर घटक पक्ष यांच्या वतीने रविवारी चिंचवड विधानसभेचे उमेदवार व भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप, पिंपरी विधानसभेचे उमेदवार, आमदार अण्णा बनसोडे आणि भोसरी विधानसभेचे उमेदवार आमदार महेशदादा लांडगे यांचे प्रतिनिधी कार्तिक लांडगे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष योगेश बहल, आमदार अश्विनीताई जगताप, उमाताई खापरे, माजी खासदार अमर साबळे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे आदींसह महायुतीतील घटक पक्षाचे पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
योगेश बहल यांनी सांगितले की, पिंपरी विधानसभेतून आमदार अण्णा बनसोडे यांची अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे. या ठिकाणी इच्छुक असणाऱ्या इतर व्यक्तींची नाराजी दूर करून अण्णा बनसोडे यांच्यासह महायुतीतील चिंचवड विधानसभेचे उमेदवार शंकर जगताप, भोसरी उमेदवार आमदार महेशदादा लांडगे या तीनही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून आणण्याचा निर्धार नागरिकांनी केला आहे. चिंचवड विधानसभेचे उमेदवार व भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त उमेदवार राज्यातून आणि शहरातील तीनही उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजप सह सर्व घटक पक्ष एकत्रित काम करीत आहेत. त्याला त्या सरकारच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली विकासाची गंगा आणि वेग आणखी वाढवण्याचे व्हिजन आहे.
पिंपरी चिंचवड शहराचे नाव देशातच नव्हे तर जगात उंचावण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत, यासाठी जनता आमच्या पाठीशी आहे असा विश्वास शंकर जगताप यांनी व्यक्त केला. सदाशिव खाडे यांनी सांगितले की, चिंचवड विधानसभेचे उमेदवार व भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप आणि पिंपरी विधानसभेचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे सोमवारी तर भोसरी विधानसभेचे आमदार व उमेदवार महेशदादा लांडगे मंगळवारी अर्ज भरणार आहेत अशी माहिती खाडे यांनी यावेळी दिली.
व्हीएस न्युज - थेरगाव परिसरात राहणारे राहुल सरवदे ह गेल्या तीन वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी केसदान हा उपक्रम राबवित आहेत. राहुल सरवदे हे थेरगाव येथील पदमजी पेपर प्रॉडक्ट्स या कंपनीत कार्यरत आहेत. तसेच ते परिवर्तन सोशल फाऊंडेशन आणि थेरगाव सोशल फाऊंडेशन या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून समाजकार्यात सक्रीय असतात. त्यांनी पहिल्यांदा २७ जुलै २०१९ रोजी केसदान केले. त्यानंतर ११ फेब्रुवारी २०२२ आणि आता पुन्हा एकदा केसदान केले आहे.
मुंबई येथील टाटा हॉस्पिटल संलग्न मदत ट्रस्ट या संस्थेकडून दान मिळालेल्या केसांचे विग बनवले जातात. हे विग कर्करोगामुळे केस गेलेल्या रुग्णांना दिले जातात. कर्करोगाशी उपचार पद्धती असलेल्या केमोथेरपीमध्ये रुग्णाच्या डोक्यावरील सर्व केस गळून जातात. त्यामुळे अनेक रुग्णांचे मानसिक खच्चीकरण होते. त्यांना मानसिक बळ मिळण्यासाठी मदत ट्रस्टने केलेले विग त्या आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना दिले जातात.
केसदान या उपक्रमाबाबत व्यक्त होताना राहुल सरवदे म्हणतात, “केसदान आणि इतर सामाजिक कार्य करत असताना मला माझे कुटुंबीय व सहकारी मित्र परिवार यांचा खूप मोठा पाठिंबा मिळाला. आजवर मी ४५ पेक्षा जास्त वेळा रक्तदान केले असून तीन वेळा केसदान केले आहे.तसेच यापूढे देखील आपल्या समाजसाठी काहीतरी चांगले करण्यासाठी मी नेहमीच अविरतपणे प्रयत्नशिल राहील.”
व्हीएस न्युज - वाकड येथील एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भारताचा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.शाळेत प्रजासत्ताक दिना निम्मित भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध कलाकृती आणि सांस्कृतिक कार्यक्रम उत्कृष्टपणे सदर केले.विद्यार्थ्यांनी भाषणे करून क्रांतिकारकांना आदरांजली व्यक्त केली.
यावेळी ॲड. दीप्ती देशपांडे यांनी ध्वजारोहण करण्याची आणि प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची संधी दिली म्हणून शाळेचे आभार व्यक्त केले. या वेळी विद्यार्थांना संबोधित करीत त्या म्हणाल्या की "दर वर्षी जानेवारी महिन्याच्या २६ तारखेला भारताचा ‘प्रजासत्ताक दिन’ साजरा केला जतो. भारत देश १५ ऑगष्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. पण त्याची लोकशाही राज्य घटना २६ जानेवारी १९५० रोजी अमलात आली. म्हणून हा ‘प्रजासत्ताक दिन म्हणून मानला जातो.आपला भारत हा एक लोकशाही राष्ट्र आहे म्हणजे हे लोकांचे, लोकांनी,लोकांसाठी चालविलेले राष्ट्र आहे. हा अधिकार भारताच्या घटनेनुसार २६ जानेवारी १९५० साली मिळाला. त्यादिवसापासून प्रजेची सत्ता सुरु झाली." पुढे त्यांनी विद्यार्थ्यांना भारतीय राज्यघटना आणि त्यातील नागरिकांचे मूलभूत हक्क या वर मार्गदर्शन केले.
यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण हक्क कायद्याबद्दल माहिती दिली आणि शिक्षणामुळेच आपण आवश्यक कौशल्ये, ज्ञान, मुल्ये आणि जीवनविषयक दृष्टीकोन आत्मसात करून सक्षम होतो’, असे प्रतिपादन करत शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले.
शाळेचे संस्थापक श्री अंकुश बोडके आणि मुख्याध्यापिका आरतारे मॅडम यांनी शिक्षणाच्या नव्या दृष्टीनुसार अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला साह्य करणाऱ्या समग्र अनुभवसंहतीचा समावेश केला आहे. त्यामुळे अभ्यासेतर समजल्या जाणाऱ्या क्रीडा, वक्तृत्व, नाट्य आदी कार्यक्रमांचा अभ्यासक्रमात समावेश होत आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच विविध कलागुणांना प्रोत्साहन देऊन त्यांना त्यात निपुण केले आहे.यामुळे ॲड. दीप्ती देशपांडे यांनी शाळेच्या संस्थापक , मुख्याध्यापिका आणि शिक्षकांचे कौतुक केले.
यावेळी शाळेतील सर्व शिक्षक आणि शाळेतील इतर स्टाफ उपस्थित होता.
व्हीएस न्युज - भारताच्या ७५ वा प्रजासत्ताक दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने खराळवाडी येथील मध्यवर्ती कार्यालयासमोर शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी अजित गव्हाणे म्हणाले की, जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाचे आम्ही सर्व नागरीक असल्याचे आम्हां सर्वांना सार्थ अभिमान असून संविधानाच्या आधारावर सर्वसामान्य नागगरीकांचे मूलभूत हक्क, अधिकार, कर्तव्याचे रक्षण करणे हे आपल्या सर्वाची जबाबदारी आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. सदर कार्यक्रमासाठी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला अध्यक्ष कविता आल्हाट, कार्याध्यक्ष फजल शेख, मा.उपमहापौर मोहंम्म्द पानसरे, माजी नगरसेविका वैशालीताई काळभोर, ओबीसी अध्यक्ष विजय लोखंडे, युवक अध्यक्ष शेखर काटे, युवती अध्यक्ष वर्षा जगताप, सेवादल अध्यक्ष महेश झपके, प्रदेश सरचिटणीस ॲड.गोरक्ष लोखंडे, ओबीसी निरिक्षक ॲड.सचिन औटे, पिंपरी विधानसभा अध्यक्ष विशाल काळभोर, मुख्य सरचिटीणीस विनायक रणसुभे, खजिनदार दिपक साकोरे, सहकार सेल अध्यक्ष श्रीधर वाल्हेकर, ख्रिश्चन सेल अध्यक्ष डॅनियल दळवी, ज्ञानेश्वर कांबळे, झोपडपट्टी सेल अध्यक्ष संतोष निसर्गंध, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष संजय औसरमल, पिंपरी विधानसभा अध्यक्ष कविता खराडे, व्यवस्थापन सेल अध्यक्ष अकबर मुल्ला, शोभा पगारिया, अर्बन सेल अध्यक्ष मनिषा गटकळ, बचत गट महासंघ अध्यक्षा ज्योती गोफणे, साफसफाई कामगार अध्यक्षा सुर्वणा निकम, महिला संघटीका पुष्पा शेळके, पौर्णिमा पालेकर, आशा शिंदे, युवराज पवार, बाळासाहेब पिल्लेवार, तुकाराम बजबळकर, युवक कार्याध्यक्ष प्रसाद कोलते, सचिन वाल्हेकर, अंकुश दिघे, दिलीपराव तापकिर, संपत पांचुदकर, काळूराम खेडकर, अभिजीत आल्हाट, नवनाथ डफळ, बाबासाहेब चौधरी, माऊली मोरे, प्रविण गव्हाणे, सतीश चोरमले, विजय दळवी, राजन नायर, दत्तात्रय बनसोडे, वर्षा शेडगे, वंदना कांबळे, देवी थोरात, रामप्रभू नखाते, महेश माने, अर्चणा लोहार, मिरा कांबळे, रजनी गोसावी, सचिन मोकाशी, राजू चांदणे, योगेश सागरे, निखिल सिंग, इम्रान शेख, सुनिल अडागळे, धनाजी तांबे इत्यादीसह पदाधिकारींसह अनेक कार्यकर्ते उपस्थिती होते.
या कार्यक्रमाचे संयोजन सेवादल अध्यक्ष महेश झपके यांनी केले.
व्हीएस न्युज - कात्रज-कोंढवा रस्त्यावर सातत्याने लहान-मोठे अपघात होत असल्याने आणि निधी अभावी भूसंपादनाची प्रक्रिया तसेच अन्य कामे रखडल्याने महापालिका प्रशासनाने सातव्या वेतन आयोगाच्या निधीतून रस्त्याच्या कामासाठी ३० कोटींचा निधी मंजूर केला आहे. सातव्या वेतन आयोगाच्या निधीतून निधी देण्याचा वर्गीकरणाचा प्रस्तावाला स्थायी समितीनेही मंजुरी दिली आहे.
रस्त्याच्या भूसंपादनासाठी राज्य शासनाकडून २०० कोटी रुपये देण्याची घोषणा झाली असली तरी हा निधी महापालिकेला अद्याप मिळालेला नाही. कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी सध्या भूसंपादनासाठी ७०० कोटींची आवश्यकता आहे. निधी अभावी रस्त्याचे काम रखडले आहे. या रस्त्यांच्या रुंदीकरणाला मंजुरी देताना रस्त्याची रुंदी ८४ मीटर एवढी प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र, रस्त्याची रुंदी ५० मीटर एवढी करण्यात येणार आहे. त्यामुळे रस्त्यासाठी भूसंपादनही कमी करावे लागणार असून, त्यासाठी २७७ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी दोनशे कोटींचा निधी राज्य शासनाने महापालिकेला द्यावा, असा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून राज्य शासनाला पाठिवण्यात आला होता.
उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा निधी दिला जाईल, अशी घोषणाही केली होती. राज्याच्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यात हा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र तो अद्यापही महापालिकेला प्राप्त झालेला नाही. या रस्त्यावर सातत्याने लहान-मोठे अपघात होत आहेत. त्यामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी रस्त्याच्या कामाची पाहणी केली होती. त्यावेळी ऑक्टोबर अखेरपर्यंत भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करून मार्च अखेरपर्यंत रस्ता रुंदीकरणाची कामे पूर्ण करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले होते.
महापालिकेला प्रकल्पाच्या व्यवस्थापन सल्लागाराचे शुल्कापोटी ११ लाख ९४ हजार ३०४ रुपये, जागेचा मोबदला १५ कोटी ३७ लाख ४५ हजार ९०० रुपये, केबल स्थलांतरित करणे यासाठी १ कोटी १ लख २० हजार १०८ रुपये असे एकूण १६ कोटी ५० लाख ६० हजार ३१२ रुपयांची महापालिकेला तातडीची आवश्यकता आहे. त्यामुळे सातव्या वेतन आयोगाच्या निधीतून ही रक्कम घेण्यात आली आहे. सातव्या वेतन आयोगासाठी १३० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी ३० कोटींचा निधी या कामांसाठी घेण्यात येणार आहे.
व्हिएस न्युज -वाकड येथील अटलांटा सोसायटी जवळ प्रेयसीने प्रियकरावर धारदार कोयत्याने सपासप वार करुन गंभीर जखमी केले. ही घटना सोमवारी (दि.१३) दुपारी तीनच्या सुमारास घडली.हॉटेलमधून प्रियकराला जाण्यास सांगितले असताना देखील तो गेला नाही याचा राग मनात धरून प्रेयसीने प्रियकरवेर जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला.याप्रकरणी महिलेवर हिंजवडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय नारायण जाधव (वय-४५ रा. श्रीधरनगर, चिंचवड) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी एका महिलेवर भादवी कलम ३०७ आणि आर्म ॲक्ट महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय जाधव हा रिक्षा चालक आहे तर महिला हॉटेल चालवते. फिर्यादीचे आरोपी महिलेसोबत प्रेमसंबंध असून दोघेही वाकड येथे राहतात. सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास फिर्य़ादी हॉटेलमध्ये आले. त्यावेळी महिलेने त्याला हॉटेलमधून राहते घरी जाण्यास सांगितले.मात्र, संजय जाधव हे गेले नाहीत. यावरून दोघांमध्ये वाद झाले.संतापलेल्या महिलेने धारदार कोयत्याने संजय जाधव यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात,हातावर, छातीवर कोयत्याने सपासप वार करुन गंभीर जखमी केले.पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.
व्हीएस न्युज -भोसरी येथील क्लासिक कम्युनिकेशन मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींकडून ११ लाख ६८ हजार २७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही घटना २९ सप्टेंबर रोजी घडली होती.
मोबाईल शॉपीच्या टेरेसवरील स्लॅबच्या बाजूला बसवलेले बार कट करुन दुकानातील १५ लाख १८ हजार ९६२ रुपये किंमतीचे ॲपल व सॅमसंग तसेच इतर कंपनीचे २७ महागडे मोबाईल फोन आरोपींनी चोरुन नेले होते. याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात कलीम हुसेन अन्सारी (वय-३३ रा. शास्त्रीनगर, बांद्रा बस डेपो, मुंबई), फिरोज नईम खान (वय-३३ रा. आळंदी रोड, चाकण) यांना अटक करून त्यांचा विरोधात भादवी कलम ४५४, ४५७,३८०, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरोडा विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस शिपाई सुमित देवकर यांना आरोपीची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुशंगाने पथकाने तांत्रिक विश्लेषण केले असता आरोपी कुर्ला मुंबई परिसरात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पथकाने दोन दिवस कुर्ला, मुंबई, अंबरनाथ व ठाणे या परिसरात आरोपींचा शोध घेऊन आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींकडे केलेल्या चौकशीत फिरोज खान याने कालीम अन्सारी याच्या सांगण्यावरून मोबाईल शॉपीमध्ये चोरी केल्याचे सांगितले. तसेच चोरलेले फोन विक्रीसाठी स्वत:कडे ठेवल्याचे सांगितले. आरोपी कामील अन्सारी याचे कुर्ला मुंबई परिसरात मोबाईल विक्री व रिपेअरींगचे दुकान आहे. आरोपींकडून चोरलेल्या एकूण मोबाईल फोन पैकी ११ लाख ६८ हजार २७० रुपयांचे मोबाईल फोन जप्त केले आहेत.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी करीत आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे,सह पोलीस आयुक्त संजय शिंदे ,अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी,पोलीस उपायुक्त गुन्हे स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर,यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील ,सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख , पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी,पोलीस अंमलदार महेश खांडे, नितीन लोखंडे, सुमित देवकर, गणेश हिंगे, प्रविण कांबळे, आशिष बनकर, गणेश कोकणे,गणेश सावंत, विनोद वीर, विक्रांत गायकवाड, सागर शेडगे, माळी व हुलगे यांच्या पथकाने केली.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002