व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या कर्मचारी महासंघाच्या स्वर्गीय शंकर अण्णा गावडे पॅनलचे प्रमुख शशिकांत उर्फ बबन झिंझुर्डे आणि इतर विजयी उमेदवारांना गुरुवारी (दि. ३ मार्च) निवडणूक निर्णय अधिकारी तुकाराम जाधव यांनी प्रमाणपत्र देवून अभिनंदन केले.
पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य पदासाठी शुक्रवारी (दि. २५ फेब्रुवारी) निवडणूक झाली होती. मतमोजणी झाल्यानंतर अध्यक्षपदाचे दुसरे उमेदवार अंबर चिंचवडे यांनी अध्यक्षपदाच्या मतांवर आक्षेप नोंदविला होता. यानंतर सर्व प्रक्रिया पुर्ण करुन निवडणूक निर्णय अधिकारी तुकाराम जाधव यांनी मंगळवारी सर्व निकाल घोषित केला.
स्वर्गीय शंकर अण्णा गावडे पॅनलचे अध्यक्षपदाचे उमेदवार शशिकांत उर्फ बबन झिंझुर्डे यांना एकूण २५३४ मते मिळाली.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या निकालाप्रमाणे स्वर्गीय शंकर आण्णा गावडे पॅनलचे १० पैकी ९ पदाधिकारी निवडून आले. तर कार्यकारणी सदस्य पदासाठी एकूण पंधरा जागांपैकी दहा उमेदवार निवडून आले. स्वर्गीय शंकर आण्णा गावडे पॅनलचे एकूण २५ पैकी १९ उमेदवार निवडून आले. यामधे उपाध्यक्षपदासाठी मनोज माछरे, महादेव बोत्रे, सरचिटणीस अभिमान भोसले, चिटणीस मंगेश कलापुरे, सहसचिव उमेश बांदल, कोषापाल नितीन समगिर, संघटक शुभांगी चव्हाण, मुख्य संघटक दिगंबर चिंचवडे तसेच कार्यकरिणी सदस्य पदावर लाला गाडे, तुषार कस्पटे, संजय कापसे, सुरज टिंगरे, चंद्रशेखर गावडे, धर्मेंद्र शिंदे, नंदकुमार इंदलकर, अण्णासाहेब वाघुले, दत्तात्रय ढगे आणि विशाल बाणेकर यांनी विजय मिळविला.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002