व्हिएस न्यूज - विराट कोहलीच्या अनुपस्थितीत टीम इंडियाची धुरा सांभाळत असलेल्या हिटमॅन रोहित शर्माने सलामीला शुक्रवारी टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वात वेगवान शतक ठोकून द.आफ्रिकेचा डेव्हीड मिलर याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. वेगवान १०० ठोकणारा तो पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. रोहितने श्रीलंकेविरोधात ४३ चेंडूत ११८ धावा करताना १०० धावा ३५ चेंडूत फटकावल्या आहेत.
रोहितपूर्वी राहुल लोकेश याने गतवर्षी २७ ऑगस्टला वेस्ट इंडिज विरोधात ४६ चेंडूत शतक ठोकण्याचा विक्रम केला होता तर डेव्हिड मिलरने २९ आक्टेाबरला बांग्लादेश विरूद्ध ३५ चेंडूत शतक ठोकले होते. रोहित शर्मानेही २ आक्टोबर २०१५ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरोधात धरमशाला येथे खेळताना १०६ रन्स ठोकून पहिले शतक नोंदविले होते.