व्हिएस न्यूज - १० डॉट ओआर कंपनीने भारतात त्यांचा तिसरा स्मार्टफोन १० डॉट ओआर डी नावाने सादर केला असून हा कंपनीच्या क्राफ्टेड फॉर अमेझॉनच्या कार्यक्रमाचा एक भाग आहे. या येाजनेअंतर्गत विक्रीसाठी तयार केलेली उत्पादने भारतात बनविली जातात. कंपनीने त्यांचा नवा फोन दोन व्हेरिएंटमध्ये आणला आहे.या फोनची विक्री ५ जानेवारीपासून सुरू होत असून त्याची नोंदणी सुरू झाली आहे.
पहिल्या व्हेरिएंटमध्ये २ जीबी रॅम व १६ जीबी इंटरनल मेमरी आहे तर दुसरे व्हेरिएंट ३ जीबी रॅम ३२ जीबी मेमरीसह आहे. या दोन्हींच्या किंमती अनुक्रमे ४९९९ व ५९९९ अशा असून हे फोन शाओमी रेडमी ५ ए व नोकिया २ शी स्पर्धा करतील. अन्य फिचर्समध्ये ५.२ इंची फुल एचडी स्क्रीन, आटोफोकस १३ एमपीचा रियर तर ५ एमपीचा सेल्फी कॅमेरा, अँड्राईट ७.१.२ नगेट ओएस, ३५०० एमएएच ची बॅटरी, रियर फिंगरप्रिंट सेन्सर असून कनेक्टीव्हीटीसाठी जीपीएस, ग्लोनास, वायफाय, एफएम रेडिओ, ब्ल्यू टूथ अशी ऑप्शन्स आहेत. हा फोन ड्युल सिम नॅनोला सपोर्ट करतो.