व्ही एस न्युज - कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजारावर गरिबांनाही उपचार मिळावेत म्हणून प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा पाच राज्यांमध्ये कॅन्सर रूग्णालये उभारणार आहेत. आसाम, झारखंड, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय घेऊन टाटा यांनी देशवासियांना दिवाळीची अनोखी भेट दिली आहे.
पाच राज्यात कॅन्सर रूग्णालय उभारण्यासाठी रतन टाटा यांनी केंद्र सरकारला एक हजार कोटी रूपये आणि इतर सुविधा देण्याची घोषणा केली आहे. कॅन्सर रूग्णांना उत्तम उपचार मिळावेत म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला आहे. टाटा ट्रस्टच्या माध्यमातून ही रूग्णालये उभारण्यात येणार आहेत. टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या धर्तीवर ही रूग्णालये उभारण्यात येतील. आसाम, राजस्थान, झारखंड, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशमध्ये बनणाऱ्या कॅन्सर रुग्णालयात टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये मिळणाऱ्या सर्व सुविधा असतील. यामुळे या राज्यांमधील रुग्णांवर तिथेच उपचार होतील.
मुंबईतील टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल ६० टक्के कॅन्सरग्रस्तांना मोफत उपचारांसह नि:शुल्क सल्लाही देतं. पण मुंबईसारख्या महागड्या शहरात येऊन उपचार घेणं सगळ्याच कॅन्सरग्रस्तांना शक्य नसतं. ही अडचण पाहून पाच राज्यांमध्ये नवी रुग्णालयं सुरु करण्यात येणार आहेत. आसाम सरकारसह या नव्या प्रोजेक्टसाठी करार केल्याची माहिती टाटा ट्रस्टने दिली आहे.
आसाममधील गुवाहाटीमध्ये कॅन्सर हॉस्पिटलमध्ये सुरु होईल. हॉस्पिटलमध्ये किमोथेरेपी, सर्जिकल ऑन्कोलॉजीसह इतर सुविधाही असतील. पहिल्या तीन टप्प्यात या प्रोजेक्टसाठी ५४० कोटी रुपये मिळतील. जयपूर कॅन्सर हॉस्पिटलसाठी २०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. रांची आणि झारखंडमध्ये हॉस्पिटलसाठी टाटा ट्रस्टने २३.५ एकर जमीन घेतली आहे. उत्तर प्रदेशासाठी वाराणसीमध्ये इंडियन रेल्वे कॅन्सर इन्स्टिट्यूट आणि संशोधन संस्था अपग्रेड केलं जाईल. आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिर ट्रस्टला २५ एकर जमीन कॅन्सर हॉस्पिटलसाठी दिली आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002