पिंपरी चिंचवड : सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या 153 जणांवर कारवाई.
पिंपरी चिंचवड
2021-06-13
व्हीएस न्यूज – सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना मास्क धारण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. असे असताना देखील काही नागरीक याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. अशा नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई केली जाते.
शनिवारी पिंपरी चिंचवड पोलिसांनी अशा बेशिस्त 153 नागरिकांवर कारवाई केली आहे.