देहूरोड - अश्लील हावभाव करून वेश्यागमनासाठी उत्तेजित करणाऱ्या सात महिलांवर गुन्हा दाखल
देहूरोड
2021-06-23
व्हिएसन्यूज – अश्लील हावभाव करून वेश्यागमनासाठी उत्तेजित करणाऱ्या सात महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई विकासनगर, देहूरोड येथे सोमवारी (दि. 21) दुपारी करण्यात आली.
याप्रकरणी महिला पोलीस कर्मचारी वैशाली कपिल आशिवाल यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सात महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास देहूरोड- कात्रज बायपास मार्गावर विकासनगर, देहूरोड येथील द्वारका लॉजच्या समोर सात महिला उभ्या होत्या. त्या येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना हातावरे करून थांबवत होत्या. तसेच अंगविक्षेप करून त्यांच्याशी लगट करून असभ्य वर्तन करीत होत्या. तसेच छेड काढून शब्दाने बोलून त्यांना वेश्यागमनासाठी उत्तेजित करीत होत्या. त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.