स्पाईनरोड, मोशी प्राधिकरण, संतनगर सेक्टर ४,६,९,११,१२ मधील पथारी, हातगाडी, टपारी धारक व रिक्षा, टेम्पो धारकांसाठी तीन दिवसीय करोना लसीकरण शिबिर आयोजित करावे - हनुमंत लांडगे
भोसरी
2021-07-07
व्हिएस न्युज - स्पाईन रोड, संतनगर, मोशी प्राधिकरण सेक्टर ४, ६,९, ११ व १३ मधील ३० हजार नागरिकांच्या जीवितास धोका असणा-या ५०० पथारी, हातगाडी, टपारी धारक व रिक्षा, टेम्पो चालकांचे तातडीने कोरोना लसीकरण करावे, यासाठी पिंपरी चिंचवड मानगरपालिकेचे आयुक्त, आमदार, नगरसेवक यांना भारतीय जनता पार्टी (का. आ.) महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष हनुमंत लांडगे यांनी पत्राद्वारे मागणी केली आहे.
सदर पत्राची गंभीरपणे दखल घेऊन परिसरातील पथारी, हातगाडी, टपारी धारक व रिक्षा, टेम्पो चालक हे कोरोना विषाणूचे सुपर स्प्रडर ठरू शकतात व तशी सुरुवात देखील झाली आहे ही गंभीर बाब लक्षात घेता तीन दिवसीय कारोना लसीकरण शिबिर आयोजित करून तातडीने लसीकरण करावे अशी विनंती निवेदनाद्वारे पिंपरी चिंचवड मानगरपालिकेचे आयुक्त, आमदार व नगरसेवक यांना हनुमंत लांडगे यांनी केली आहे.