व्हिएस न्युज - कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्र पावसामुळे अनेक ठिकाणी विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. महापूर, भूस्खलनामुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागले. राज्याती स्वयंसेवी संस्थासह अनेक नागरिकांनी आपापल्या परीने आपत्तीग्रस्तांपर्यंत मदत पोहचवण्यासाठी प्रयत्न करत आहे.
अशातच राज्यातील भारतीय जनता पार्टी ,कामगार आघाडी, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गणेश ताठे यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त मदत कार्यास खारीचा वाटा म्हणून भारतीय जनता पार्टी ,कामगार आघाडीचे, महाराष्ट्र प्रदेश ,सोशल मीडिया प्रमुख आणि सरचिटणीस हनुमंत लांडगे यांनी स्वतःची एक महिन्याची पेन्शन मदत म्हणून जाहीर केली आहे. सदर पेन्शनची रक्कम १ ऑगस्ट रोजी रोखस्वारुपत स्वाधीन करण्यात येणार आहे.
सेवा व मदत करण्यात नेहमीच तत्पर..
एक विचारशील कामगार नेता असलेल्या, हनुमंत लांडगे यांचा साधेपणा आणि मुक्त विचारसरणी यांवर विश्वास आहे. पारदर्शकतेला प्राथमिक महत्त्व देत, त्यांचा स्वभाव कायम आपल्या मातीशी जोडून राहण्याचा बनला आहे. एक खरा कामगार नेता सर्वंसमोर योग्य उदाहरण ठेवून नेतृत्व करतो. लांडगे यांचा स्वभाव अतिशय प्रेमळ आहे आणि जनतेच्या हितासाठी त्यांनी आपले कार्य समर्पित केले आहे. सर्व परिणामांचा विचार करुन काम करण्याचे धोरण ते अंमलात आणतात.तंत्रज्ञानाच्या युगात लोक डिजिटल माध्यमांद्वारे जोडले गेले आहेत. लांडगे यांनीही हे तंत्रज्ञान आत्मसात करून मोठ्या प्रमाणात समाजापर्यंत पोचण्यासाठी त्याचा उपयोग केला आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002