व्हिएस न्यूज : पुणे बंगळूर महामार्गावर शिरवळ गावच्या हद्दीत भरधाव वेगातील ट्रकने सहा वाहनांना धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच गाडीतील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जण जखमी असल्याची माहिती समोर येते. मंगळवारी रात्री हा अपघात झाला.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की साताऱ्याहून पुण्याच्या दिशेला जात असताना भरधाव ट्रकने सहा गाड्यांना धडक दिली. यामध्ये दुधाचा ट्रक, मालट्रक, जीप, वॅगनार आणि आणखी दोन अशा सहा वाहनांना या भरधाव वेगातील ट्रकने धडक दिली. या अपघातात व्हॅगनार कारचा चक्काचूर झाला आहे तर इतर गडांची देखील प्रचंड नुकसान झाले आहे. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान अपघाताची घटना घडल्यानंतर महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्यासाठी पुढाकार घेतला. त्यातील जखमी नागरिकांना बाहेर काढत असताना तिघांचा जागीच मृत्यू झाल्याचे लक्षात आलं. अपघाताचा या घटनेमुळे परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002