व्हिएस न्युज- पिंपरी आणि भोसरी परिसरातील युवा कामगार नेता आणि सामाजिक कार्यकर्ते नरेश जिनवाल यांची भारतीय जनता पार्टी, कामगार आघाडी, पिंपरी चिंचवड शहर जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. हनुमंत लांडगे ( भाजपा, महाराष्ट्र प्रदेश,कामगार आघाडी, सोशल मीडिया प्रमुख/ सरचिटणीस) आणि प्रकाश मुगडे ( भारतीय जनता पार्टी,कामगार आघाडी, पिंपरी चिंचवड शहर जिल्हा अध्यक्ष )यांच्या हस्ते इतर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली.
सामाजिक कार्यकर्ता व कामगारांच्या न्याय हक्कासाठी नेहमी कटिबध्द असणारे नरेश जिनवाल यांनी माथाडी संघटनेच्या माध्यमातून अनेक कामगारांना न्याय आणि रोजगार उपलब्ध करून दिला आहे. अखिल भारतीय वाल्मिकी समाज पिंपरी चिंचवड शहर महासचिव पदी त्यांना निवडून दिले होते आणि त्या माध्यमातून अनेक सफाई कामगारांना मार्गदर्शन आणि त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम नरेश जिनवाल यांनी केले आहे.अशा विविध सामाजिक आणि कामगार क्षेत्रात कार्यरत असणा-या संस्था, संघटनांवर विविध पदांवर काम केले आहे.
नरेश जिनवाल यांनी सोशल मीडिया मार्फत आपला संपर्क क्रमांक ( 7219228866/9922877462) प्रसिद्ध करून पिंपरी चिंचवड परिसरातील कामगार वर्गाला कोणत्याही प्रकारच्या मदतीची गरज भासल्यास निसंकोच पणे संपर्क साधावा आणि त्यावर निस्वार्थीपणे सहकार्य केले जाईल असे आव्हान केले आहे.
"माझ्यावर जिवापाड प्रेम करणारा माझा कामगार वर्ग, मित्र परिवार आणि नागरिकांसह भाजपा पक्षश्रेष्ठी, आणि लोकप्रतिनिधींच्या अशिर्वादने माझी पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष, भा.ज.पा. (कामगार आघाडी) पदी नुकतीच निवड झाली, तुमच्या सारख्याच्या कृपाशिर्वाद, शुभेच्छा, सदिच्छामुळेच हे घडलं", असे म्हणत आभार मानले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002