व्हिएस न्युज - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेेतिल स्थायी समितीचे सभापती ॲड. नितीन ज्ञानेश्वर लांडगे आणि त्यांचे स्विय सहाय्यक व मुख्य लिपिक ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे ,विजय शंभुलाल चावरिया ( पद - लिपिक) , राजेंद्र जयवंतराव शिंदे ( पद - संगणक चालक ) , अरविंद भीमराव कांबळे ( पद - शिपाई) यांना १ लाख अठरा हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दि. १८ रोजी ताब्यात घेतले आहे.
सदर विषयी पिंपरी पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम - ७, ७अ, १२ अंतर्गत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पोलिसांनी दिलेली माहितीनुसार सदर प्रकरणतील तक्रारदार हे जाहिरातीचा व्यवसाय करत असून त्यांनी पिंपरी चिंचवड महानगपालिकेच्या कार्यक्षेत्रात होर्डिंग उभरण्याकरिता भरलेल्या २८ निविदा मंजूर झालेल्या आहेत. परंतु त्यांची वर्क ऑर्डर अद्याप न निघाल्याने तक्रारदार हे स्थायी समितीचे सभापती ॲड. नितीन ज्ञानेश्वर लांडगे आणि त्यांचे स्विय सहाय्यक व मुख्य लिपिक ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे यांना भेटले आसता वर्क ऑर्डर मिळवण्यासाठीच्या करारनाम्यावर सही करण्यासाठी त्या २८ निविदांच्या बोली रक्कमेच्या (बीड अमाउंट) ३ टक्के रक्कम १० लाख रुपये लाचेची मागणी केली .
तडजोडीअंती २ टक्के प्रमाणे सहा लाख घेण्याचे मान्य केले व ६ लाख रुपयांची मागणी करून त्यापैकी तयार असलेल्या ६ करारनाम्यांच्या कागदपत्रांवर सही शिक्का देण्याकरिता १ लाख अठरा हजार लाच रक्कमेची मागणी करून ती महापालिकेतील लिपिक विजय चावरीया, संगणक चालक राजेंद्र शिंदे व शिपाई अरविंद कांबळे यांच्या मार्फत स्विकरणात आली असता लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्वांना ताब्यात घेतलं असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभागाच्या उपअधीक्षक सीमा मेहेंदळे करत आहेत.
विरोधी पक्षाकडून सत्ताधारी भाजपवर सडकून टीका....
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धाडेमुळे महापालिकेत पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धाडे बद्दल महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे पदाधिकार्यांनी बोलण्यास टाळा टाळ केली . मात्र विरोधी पक्षाकडून सत्ताधारी भाजपवर सडकून टीका करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधीपक्षनेते राजू मिसाळ, माजी महापौर मंगला कदम, वैशाली घोडेकर, माजी विरोधीपक्षनेते नाना काटे, माजी स्थायी समिती अध्यक्ष अजित गव्हाणे उपस्थित होते.
संजोग वाघेरे म्हणाले, ‘‘भय आणि भ्रष्टाचार मुक्त पिंपरी-चिंचवड असे अभिवचन देऊन भाजप सत्तेत आली. किती पारदर्शक आणि भ्रष्ट कारभार आहे, हे या कारवाईवरून दिसून येते.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002