सुनियोजित षडयंत्र आखून ॲड. नितीन लांडगे यांना जाळ्यात अडकविले – चंद्रकांत पाटील
पिंपरी
2021-08-19
व्हिएस न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांना सुनियोजित षडयंत्र आखून जाळ्यात अडकविल्याचे एकूण परिस्थितीवरून लक्षात येत आहे. मात्र, या प्रकरणाची तपशीलवार माहिती घेऊन या कटकारस्थानाचा मूळ शोधण्यासाठी भाजपाच्या पिंपरी-चिंचवडच्या प्रभारी आमदार माधुरी मिसाळ यांची नियुक्ती करण्यात आल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
माधुरी मिसाळ उद्या 20 ऑगस्ट रोजी पिंपरी-चिंचवडला येणार असून, त्या सर्वांची भेट घेऊन या तक्रारी मागचे सत्य जाणून घेतील आणि त्याचा अहवाल माझ्याकडे सुपूर्द करतील, असेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
सत्तेचा दुरुपयोग करून आमच्या लोकप्रतिनिधींवर आरोप केले जात आहेत. त्यांना अडकविण्याचे प्रयत्न होत आहेत. मात्र आमचा न्याय संस्थेवर विश्वास आहे व लवकरच सत्य बाहेर येईल, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. चंद्रकांत पाटील यांची भूमिका भाजपचे मुख्य प्रवक्ते, संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी दिली.