व्हीएस न्यूज - पोषण, आरोग्य आणि उत्तम जीवनशैलीप्रती दिलेले वचन पाळण्यासाठी नेस्ले इंडिया या कंपनीतर्फे आंतरराष्ट्रीय शेफ डेच्या निमित्ताने किशोरवयीन मुलांसाठी मुंबईत आरोग्यपूर्ण पदार्थाचा स्वयंपाक या विषयावरील कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या उपक्रमाचाच एक भाग म्हणून नेस्ले हेल्दी कीड्स प्रोग्राम या कंपनीच्या मोहिमेचा भाग असलेल्या मुलांनी प्रसिद्ध शेफशी गप्पा मारल्या आणि विविध पदार्थ खाण्याचे फायदे काय काय असतात, आरोग्यपूर्ण स्वयंपाक कसा करायचा आणि ‘हेल्दी हिरो’ कसे बनायचे,याची माहिती मिळवली.
सुयोग्य व पोषक आहार, पुरेसा व्यायाम, आहाराच्या चांगल्या सवयी आणि चुणचुणीत जीवनशैली यामुळे आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते. मुलांना विविध पदार्थ स्वत: तयार करायला शिकवून सर्व प्रकारचे अन्न खाण्यासाठी उद्युक्त करणे व त्यातून थोडी मजाही करू देणे हा या उपक्रमामागचा उद्देश होता. या उपक्रमाबाबत नेस्ले इंडिया लिमिटेडच्या कॉर्पोरेट अफेअर्स विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष संजय खजुरिया म्हणाले, ‘‘यंदाच्या आंतरराष्ट्रीय शेफ डेची थीम होती, ‘हेल्दी हिरोंसाठी हेल्दी खाद्यपदार्थ’. प्रसिद्ध शेफच्या मदतीने लहान मुलांना स्वत: पुढाकार घेऊन काही खाद्यपदार्थ बनवण्याची संधी देतानाच त्यांना आरोग्यपूर्ण आहार सवयींबाबत माहिती देणे हा आमचा मुख्य हेतू होता.
आरोग्य आणि सर्वागीण विकासासाठी उत्तम आहार ही गुरुकिल्ली आहे, असा आमचा विश्वास आहे. सक्रिय जीवनशैलीसोबतच संतुलित आहाराचे महत्त्व लोकांना पटवून देऊन त्याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या आमच्या वचनाचाच नेस्ले हेल्दी कीड्स प्रोग्राम हा महत्त्वाचा भाग आहे.’’
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002