व्हीएस न्यूज - महाराष्ट्र सरकारबरोबर सामंजस्य करार झाल्यानंतर वॉलमार्टने मुंबई व परिसरातील व्यवसायावर लक्ष केंद्रित केले आहे. व्यावसायिक, छोटे विक्रेते, दुकानदार यांच्यासाठी वॉलमार्टची सेवा त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी उपयोगी ठरणार आहे.
भिवंडीजवळील कंपनीच्या गोदामातून त्यांच्या मुंबई, ठाणे, नवी मुंबई तसेच परिसरातील ग्राहकाना डिलिव्हरी दिली जाणार आहे. वॉलमार्ट शहरात त्यांच्या सदस्यांसाठी फुलफिलमेंट सेंटर (एएफसी) सुरू करणार आहे. या एफसीमुळे १५०० पेक्षा जास्त प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे.
कंपनीचे सदस्य चार प्रकारे येथून खरेदीचे व्यवहार करू शकतात. वेबसाईटवर वस्तू पाहून व पैसे देण्याची सोयीस्कर सुविधा त्यांच्या सदस्याना उपलब्ध असणार आहे. त्याशिवाय मोबाईल एपद्वारे, कॉल सेंटरला फोन करून तसेच विविध किराणा रिलेशनशीप मॅनेजरशी संपर्क वॉलमार्टशी साधता येईल.
फुलफिलमेंट सेंटरची घोषणा करताना वॉलमार्ट इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व अध्यक्ष क्रिश अय्यर म्हणाले, महाराष्ट्रात कॅश व कॅरी व्यवसायाची घोषणा करताना मला आनंद होत आहे. यामुळे मुंबई व परिसरातील दुकानदारांना त्यांचे दुकान, व्यवसाय सोडून माल खरेदीसाठी बाहेर पडण्याची गरज नाही. उत्तम दर्जा, व्यावसायिकांना अपेक्षित रक्कम, दारापयर्ंत वस्तूची डिलिव्हरी व तेव्हाच पैसे देण्याची सुविधा आदी सेवा आम्ही ग्राहकाना देणार आहोत.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002