व्हीएस न्यूज - महाराष्ट्र सरकारबरोबर सामंजस्य करार झाल्यानंतर वॉलमार्टने मुंबई व परिसरातील व्यवसायावर लक्ष केंद्रित केले आहे. व्यावसायिक, छोटे विक्रेते, दुकानदार यांच्यासाठी वॉलमार्टची सेवा त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी उपयोगी ठरणार आहे.
भिवंडीजवळील कंपनीच्या गोदामातून त्यांच्या मुंबई, ठाणे, नवी मुंबई तसेच परिसरातील ग्राहकाना डिलिव्हरी दिली जाणार आहे. वॉलमार्ट शहरात त्यांच्या सदस्यांसाठी फुलफिलमेंट सेंटर (एएफसी) सुरू करणार आहे. या एफसीमुळे १५०० पेक्षा जास्त प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे.
कंपनीचे सदस्य चार प्रकारे येथून खरेदीचे व्यवहार करू शकतात. वेबसाईटवर वस्तू पाहून व पैसे देण्याची सोयीस्कर सुविधा त्यांच्या सदस्याना उपलब्ध असणार आहे. त्याशिवाय मोबाईल एपद्वारे, कॉल सेंटरला फोन करून तसेच विविध किराणा रिलेशनशीप मॅनेजरशी संपर्क वॉलमार्टशी साधता येईल.
फुलफिलमेंट सेंटरची घोषणा करताना वॉलमार्ट इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व अध्यक्ष क्रिश अय्यर म्हणाले, महाराष्ट्रात कॅश व कॅरी व्यवसायाची घोषणा करताना मला आनंद होत आहे. यामुळे मुंबई व परिसरातील दुकानदारांना त्यांचे दुकान, व्यवसाय सोडून माल खरेदीसाठी बाहेर पडण्याची गरज नाही. उत्तम दर्जा, व्यावसायिकांना अपेक्षित रक्कम, दारापयर्ंत वस्तूची डिलिव्हरी व तेव्हाच पैसे देण्याची सुविधा आदी सेवा आम्ही ग्राहकाना देणार आहोत.
व्हीएस न्यूज - डोनियर इंडस्ट्रीज लिमिटेड यांचा सत्कार ७० मोस्ट ट्रस्टेड पॉवर ब्रॅण्डस या शीर्षकाने सन्मानित केले आहे. पॉवरब्रांड मुंबई समिटचे नुकतेच मुंबईमध्ये आयोजन करण्यात आले होते. यावेळी डोनियरचे कार्यकारी संचालक अजय अग्रवाल यांना शान आणि दिव्या दत्ताकडून पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. याप्रसंगी अग्रवाल यांनी सांगितले की, मी या संधीचा लाभ घेऊन आमच्या ग्राहकांना, व्यापार क्षेत्रातील तज्ज्ञांना, चॅनेल भागीदार आणि तसेच हितचिंतकांचे आभार इच्छितो.
माझा ठामपणे विश्वास आहे की हे ग्राहक आणि पुरवठादार यांच्यातील विश्वासार्हतेला निश्चितपणे आणखी मजबूत करेल पॉवर ब्रॅण्डस अशाप्रकारे एक विशिष्ट उपक्रम आहे, यशांचा एक मोठा उत्सव, ब्रँडचे यश हायलाईट करते आणि त्यांच्यामागे असलेल्या व्यक्तींवर प्रकाश टाकते.
व्हीएस न्यूज - पोषण, आरोग्य आणि उत्तम जीवनशैलीप्रती दिलेले वचन पाळण्यासाठी नेस्ले इंडिया या कंपनीतर्फे आंतरराष्ट्रीय शेफ डेच्या निमित्ताने किशोरवयीन मुलांसाठी मुंबईत आरोग्यपूर्ण पदार्थाचा स्वयंपाक या विषयावरील कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या उपक्रमाचाच एक भाग म्हणून नेस्ले हेल्दी कीड्स प्रोग्राम या कंपनीच्या मोहिमेचा भाग असलेल्या मुलांनी प्रसिद्ध शेफशी गप्पा मारल्या आणि विविध पदार्थ खाण्याचे फायदे काय काय असतात, आरोग्यपूर्ण स्वयंपाक कसा करायचा आणि ‘हेल्दी हिरो’ कसे बनायचे,याची माहिती मिळवली.
सुयोग्य व पोषक आहार, पुरेसा व्यायाम, आहाराच्या चांगल्या सवयी आणि चुणचुणीत जीवनशैली यामुळे आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते. मुलांना विविध पदार्थ स्वत: तयार करायला शिकवून सर्व प्रकारचे अन्न खाण्यासाठी उद्युक्त करणे व त्यातून थोडी मजाही करू देणे हा या उपक्रमामागचा उद्देश होता. या उपक्रमाबाबत नेस्ले इंडिया लिमिटेडच्या कॉर्पोरेट अफेअर्स विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष संजय खजुरिया म्हणाले, ‘‘यंदाच्या आंतरराष्ट्रीय शेफ डेची थीम होती, ‘हेल्दी हिरोंसाठी हेल्दी खाद्यपदार्थ’. प्रसिद्ध शेफच्या मदतीने लहान मुलांना स्वत: पुढाकार घेऊन काही खाद्यपदार्थ बनवण्याची संधी देतानाच त्यांना आरोग्यपूर्ण आहार सवयींबाबत माहिती देणे हा आमचा मुख्य हेतू होता.
आरोग्य आणि सर्वागीण विकासासाठी उत्तम आहार ही गुरुकिल्ली आहे, असा आमचा विश्वास आहे. सक्रिय जीवनशैलीसोबतच संतुलित आहाराचे महत्त्व लोकांना पटवून देऊन त्याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या आमच्या वचनाचाच नेस्ले हेल्दी कीड्स प्रोग्राम हा महत्त्वाचा भाग आहे.’’
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002