Breaking News

कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन | दफनभूमीसाठी मुस्लिम समाज आक्रमक ; मृतदेह महापालिका आवारात दफन करण्याचा इशारा | भोसरीला वीजपुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवण्यासाठी रवी लांडगेंचे थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना निवेदन | मुस्लीम समाज केवळ निवडणुकांपुरता का?; खासदार जलील यांचा राष्ट्रवादी, काँग्रेसला सवाल! | पुणे जिल्हा नियोजन समिती बैठकीत एकूण ७९३ कोटी ८६ लक्षच्या प्रारुप आराखड्यास मान्यता | वैद्यकीय शिक्षण विभागात आमुलाग्र बदलासाठी काम करा – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख | ओबीसी समाजचे आरक्षण रद्द होण्यास भाजप जबाबदार – संजोग वाघेरे‌ पाटील | अमृत महोत्सवी वर्षात सामाजिक न्यायाची आघाडी | आंतरराज्य बनावट औषध खरेदी व विक्री करणाऱ्यांवर कारवाई | महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी जनचळवळ उभारू – महिला आयोग अध्यक्षा रूपाली चाकणकर | आरक्षण पुन्हा मिळविण्यासाठी ओबीसींचे संघटन उभे करु या - वसंत लोंढे | महिलांना सन्मान देण्यासाठी सोनिया गांधी यांची प्रमुख भुमिका - सचिन साठे | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मिळकत धारकास सामान्य मिळकत करात शंभर टक्के सूट | झेंडे समुहाकडून २२.४६ कोटींचा बँकेला गंडा’: सेवा विकास बँक घोटाळा | पुण्यातून सतरा वर्षांच्या तीन तरुणी बेपत्ता, अज्ञात इसमांनी पळवून नेल्याचा संशय | पिंपरीच्या डॉ डी. वाय पाटील रुग्णालयात कर्करोगावरील दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी | सभापती नितीन लांडगे यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला! | अण्णासाहेब मगर स्टेडियम खासगीकरण केल्यास कामगार लढा उभारु…..डॉ. कैलास कदम | लाचे प्रकरणी ॲड. नितीन लांडगे यांना २ दिवसांची पोलीस कोठडी | भ्रष्टाचाराने बरबटलेली सत्ता बरखास्त करून पालिकेवर प्रशासक नेमावा – माजी आमदार विलास लांडे |
V. S. News
अण्णासाहेब मगर स्टेडियम खासगीकरण केल्यास कामगार लढा उभारु…..डॉ. कैलास कदम

व्हिएस न्यूज - पिंपरी नेहरु नगर येथिल अण्णासाहेब मगर स्टेडियमचे खासगीकरण केल्यास कामगार नगरीतील कामगारांचा तीव्र लढा उभारु असा इशारा कामगार नेते डॉ. कैलास कदम यांनी दिला.

पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांना दिलेल्या पत्रात डॉ. कदम यांनी पुढे म्हटले आहे की, महानगरपालिका व महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ यांच्यामध्ये 1992 साली करार झाला होता. त्यानुसार महानगरपालिकेने अण्णासाहेब मगर स्टेडियमच्या मोबदल्यात कामगार कल्याण मंडळास 5 कोटी रुपये आणि शहरात पाच ठिकाणी भूखंड द्यावेत असे ठरले होते. या करारातील अनेक अटींची अद्यापही पुर्तता झालेली नाही.

या ठिकाणी शहरातील कामगार आणि त्यांच्या कुटूंबियांना क्रीडा सुविधा उपलब्ध करुन देणे ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे. महानगरपालिका प्रशासन मात्र आपली जबाबदारी टाळून या स्टेडियमचे खासगीकरण करण्याचे नियोजन करीत आहे. स्टेडियमच्या या भूखंडाचे खासगीकरण करुन भांडवलदारांच्या घशात घालण्याचा घाट मनपा प्रशासन बेकायदेशीररीत्या करीत आहे.

शहरातील कष्टकरी कामगार व त्यांच्या कुटुंबियांच्या हितासाठी करण्यात आलेल्या या करारानुसार महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळास 5 कोटी रुपये व शहरात पाच भूखंड मिळणे अपेक्षित होते. पिंपरी 1992 मध्ये स्टेडियम ताब्यात घेतल्यापासून आजतागायत मनपाकडून स्टेडियमच्या विकसनासाठी कोणत्याही प्रकारचे नियोजन केलेले नाही. कोरोनाच्या महामारीच्या काळात कामगारांचा विश्वासघात करीत स्टेडियम पाडण्यात आले. आता हा भूखंड पीपीपी तत्वावर खासगी कंपनीला देण्याचा घाट घातला जात आहे.

शहराच्या मध्यवर्ती असणा-या 28 एकर जागेत मनपा प्रशासनाने कामगारांना विविध सेवासुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत . ही अनेक वर्षांची हजारो कामगारांची प्रलंबित मागणी असताना याकडे हेतूपुरस्पर दुर्लक्ष करुन प्रशासनातील काही अधिकारी व पदाधिकारी बेकायदेशीररीत्या कामगारांचा न्याय हक्क डावलून अन्याय करीत आहे.

अण्णासाहेब मगर स्टेडियमच्या खासगीकरणाचा निर्णय आयुक्तांनी स्व:ताच्या अधिकारात रद्द करावा अन्यथा कामगारांच्या वतीने तीव्र आंदोलन करु असा इशारा दिला

...Read More

V. S. News
लाचे प्रकरणी ॲड. नितीन लांडगे यांना २ दिवसांची पोलीस कोठडी

व्हिएस न्यूज - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेेतिल स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन ज्ञानेश्वर लांडगे आणि त्यांचे स्विय सहाय्यक व मुख्य लिपिक ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे ,विजय शंभुलाल चावरिया ( पद - लिपिक) , राजेंद्र जयवंतराव शिंदे ( पद - संगणक चालक ) , अरविंद भीमराव कांबळे ( पद - शिपाई) यांना १ लाख अठरा हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दि. १८ रोजी ताब्यात घेतले होते.

याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पिंपरी पालिकेत छापा घातला. त्यावेळी स्थायी समिती अध्यक्षाच्या स्वीय सहायकाच्या केबिनमध्ये ८ लाखांहून अधिक बेकायदा रक्कम आढळून आली आहे. या कारवाईनंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने तातडीने अध्यक्ष लांडगे आणि स्वीय सहायक यांच्या घरावर छापे घातले असून ही झडतीची कारवाई पहाटेपर्यंत सुरू होती.याप्रकरणी स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे .

ज्या पाच जणांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक केली होती .त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आलं होत त्यावेळी नितीन लांडगे यांना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या धाडे मुळे शहरात मोठी खळबळ माजली असून यामुळे राजकीय क्षेत्रात भीतीचे वातावरण पसरलं आहे .आणखी दिग्गज नगरसेवकांची नावे पुढे येणार असल्याच्या चर्चा राजकीय क्षेत्रामध्ये सुरु आहेत.

...Read More

V. S. News
भ्रष्टाचाराने बरबटलेली सत्ता बरखास्त करून पालिकेवर प्रशासक नेमावा – माजी आमदार विलास लांडे

व्हिएस न्यूज - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सत्ताधा-यांनी भ्रष्टाचाराची मालिकाच सुरू केली आहे. मूलभूत सोयीसुविधांपोटी सर्वसामान्य नागरिकांनी भरलेल्या कराच्या पैशांवर दिवसाढवळ्या दरोडा टाकला जात आहे. लाच लूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने महापालिकेत बुधवारी सायंकाळी धाड टाकल्यानंतर सत्ताधा-यांचा हा प्रताप उघडकीस आला आहे. या कारवाईने सत्ताधा-यांच्या सामुदायीक भ्रष्टाचाराचा बुरखा फाटला आहे. गेल्या साडेचार वर्षात सत्ताधा-यांनी केवळ भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारच केला आहे. भ्रष्टाचाराने बरबटलेली ही सत्ता त्वरीत बरखास्त करण्यात यावी. पालिकेतील सर्वच विभागाशी संबंधीत पदाधिका-यांची सखोल चौकशी करावी. जोपर्यंत चौकशी पूर्ण होऊन दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत सत्ता बरखास्त करून महापालिकेवर प्रशासक नेमावा, अशी मागणी माजी आमदार विलास लांडे यांनी केली आहे.

यासंदर्भात लांडे यांनी प्रसिध्दीपत्रक दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, कोरोना विषाणू संक्रमणाच्या काळात नागरिकांना जीव वाचवणे मुष्कील झाले होते. लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या नोक-या गेल्या, गोरगरिबांच्या हातचे काम गेले, छोट्या-मोठ्या व्यवसायीक आणि कामगारांच्या घरातील चूल पेटणे कठीण झाले होते. अशा परिस्थितीत नागरिकांना सोयी सुविधा देण्याचे प्रथम कर्तव्य महापालिकेतील सत्ताधा-यांचे असते. मात्र, नागरिकांना नागरी सुविधांच्यापलीकडे काहीही न देता त्यांच्याकडून कराचे लाखो, करोडो रुपये वेळेत वसूल करून घेतले. नागरिकांनी करातून भरलेल्या करोडो रुपयांवर दरोडा टाकण्याचा सपाटा या सत्ताधारी पक्षाच्या भ्रष्ट पदाधिका-यांनी लावला आहे. याला मुरड घालण्यासाठी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे अनेकवेळा तक्रारी केल्या, निवेदने ही दिली. तरीही, या भ्रष्टाचाराला लगाम लागला नाही.

अधिका-यांना हाताशी धरून सत्ताधारी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करत असल्याचे आता उघडकीस आले आहे. हे लक्षात आल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी महापालिकेत धाड टाकली. या धाडीत सभापतींसह चार कर्मचा-यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे सत्ताधा-यांच्या पारदर्शक कारभाराचा बुरखा फाटला असून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले आहे. पालिकेतील भ्रष्ट कारभार थांबविण्यासाठी सत्ताधारी पक्षाच्या पदाधिका-यांनी अन्य विभागात देखील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा संशय आहे.

आगामी महापालिका निवडणूक अवघ्या सहा महिन्यांवर आलेली आहे. त्यामुळे सत्ताधा-यांना भ्रष्ट पैसा जमा करण्याची हाव सुटली आहे. वाट्टेल त्या पध्दतीने निविदा राबविल्या जात आहेत. मर्जीतील व नातेवाईक असलेल्या ठेकेदाराला काम मिळवून देण्यासाठी रिंग करून निविदा भरली जात आहे. लाखो रुपयांची कामे थेट पध्दतीने दिली जात आहे. यापूर्वी बनावट एफडीआर प्रकरणात देखील पदाधिका-यांचे नातेवाईक असलेल्या ठेकेदारांचा हात आहे. त्यांना वाचवण्यासाठी सत्ताधा-यांनी आयुक्तांवर दबाव आणून बनावट ‘एफडीआर’चे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला आहे. सुमारे तीन लाखांची लाच आपल्या बॅंक खात्यावर जमा करून घेताना वैद्यकीय विभागातील एक अधिकारी रंगेहात सापडला. तरीही, आयुक्तांकडून त्याच्यावर कारवाई झाली नाही. अशी अनेक प्रकरणे आहेत. त्याची देखील चौकशी झाली पाहिजे, असेही लांडे यांनी म्हटले आहे.

सखोल चौकशीची मागणी करणार

कोरोनाच्या नावाखाली तर सत्ताधा-यांनी पालिका अक्षरषः लुटून खाल्ली आहे. अधिकारी, नगरसेवकांच्या भागीदारीत कोविड केअर सेंटर चालविण्यासाठी कोट्यवधी रुपयांची बिले काढण्यात आली आहेत. असेच चालू राहिले तर पुढील सहा महिन्यात भ्रष्ट पदाधिकारी पालिकेची तिजोरी रिकामी करतील. त्यामुळे सत्ताधारी पदाधिका-यांच्या संबंधित असलेल्या सर्व विभागांची सखोल चौकशी व्हावी. तोपर्यंत महापालिकेवरील सत्ता बरखास्त करून कामकाज सुरळीत चालवण्यासाठी प्रशासक नेमावा. चौकशीमध्ये दोषी आढळणा-या पदाधिकारी, अधिकारी व कर्मचा-यांवर कोठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी लांडे यांनी केली आहे. यासंदर्भात महाविकास आघाडी सरकारचे प्रणेते व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे तक्रार करणार असल्याचेही लांडे यांनी प्रसिध्दीपत्रकात नमूद केले आहे.

...Read More

V. S. News
सुनियोजित षडयंत्र आखून ॲड. नितीन लांडगे यांना जाळ्यात अडकविले – चंद्रकांत पाटील

व्हिएस न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांना सुनियोजित षडयंत्र आखून जाळ्यात अडकविल्याचे एकूण परिस्थितीवरून लक्षात येत आहे. मात्र, या प्रकरणाची तपशीलवार माहिती घेऊन या कटकारस्थानाचा मूळ शोधण्यासाठी भाजपाच्या पिंपरी-चिंचवडच्या प्रभारी आमदार माधुरी मिसाळ यांची नियुक्ती करण्यात आल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

माधुरी मिसाळ उद्या 20 ऑगस्ट रोजी पिंपरी-चिंचवडला येणार असून, त्या सर्वांची भेट घेऊन या तक्रारी मागचे सत्य जाणून घेतील आणि त्याचा अहवाल माझ्याकडे सुपूर्द करतील, असेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

सत्तेचा दुरुपयोग करून आमच्या लोकप्रतिनिधींवर आरोप केले जात आहेत. त्यांना अडकविण्याचे प्रयत्न होत आहेत. मात्र आमचा न्याय संस्थेवर विश्वास आहे व लवकरच सत्य बाहेर येईल, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. चंद्रकांत पाटील यांची भूमिका भाजपचे मुख्य प्रवक्ते, संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी दिली.

...Read More

V. S. News
पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थायी समितीचे सभापती, दोन लिपिक,एक संगणक चालक व शिपयावर लाच स्वीकारल्या प्रकरणी अटक.

व्हिएस न्युज - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेेतिल स्थायी समितीचे सभापती ॲड. नितीन ज्ञानेश्वर लांडगे आणि त्यांचे स्विय सहाय्यक व मुख्य लिपिक ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे ,विजय शंभुलाल चावरिया ( पद - लिपिक) , राजेंद्र जयवंतराव शिंदे ( पद - संगणक चालक ) , अरविंद भीमराव कांबळे ( पद - शिपाई) यांना १ लाख अठरा हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दि. १८ रोजी ताब्यात घेतले आहे.

सदर विषयी पिंपरी पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम - ७, ७अ, १२ अंतर्गत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पोलिसांनी दिलेली माहितीनुसार सदर प्रकरणतील तक्रारदार हे जाहिरातीचा व्यवसाय करत असून त्यांनी पिंपरी चिंचवड महानगपालिकेच्या कार्यक्षेत्रात होर्डिंग उभरण्याकरिता भरलेल्या २८ निविदा मंजूर झालेल्या आहेत. परंतु त्यांची वर्क ऑर्डर अद्याप न निघाल्याने तक्रारदार हे स्थायी समितीचे सभापती ॲड. नितीन ज्ञानेश्वर लांडगे आणि त्यांचे स्विय सहाय्यक व मुख्य लिपिक ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे यांना भेटले आसता वर्क ऑर्डर मिळवण्यासाठीच्या करारनाम्यावर सही करण्यासाठी त्या २८ निविदांच्या बोली रक्कमेच्या (बीड अमाउंट) ३ टक्के रक्कम १० लाख रुपये लाचेची मागणी केली .

तडजोडीअंती २ टक्के प्रमाणे सहा लाख घेण्याचे मान्य केले व ६ लाख रुपयांची मागणी करून त्यापैकी तयार असलेल्या ६ करारनाम्यांच्या कागदपत्रांवर सही शिक्का देण्याकरिता १ लाख अठरा हजार लाच रक्कमेची मागणी करून ती महापालिकेतील लिपिक विजय चावरीया, संगणक चालक राजेंद्र शिंदे व शिपाई अरविंद कांबळे यांच्या मार्फत स्विकरणात आली असता लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्वांना ताब्यात घेतलं असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभागाच्या उपअधीक्षक सीमा मेहेंदळे करत आहेत.

विरोधी पक्षाकडून सत्ताधारी भाजपवर सडकून टीका....

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धाडेमुळे महापालिकेत पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धाडे बद्दल महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे पदाधिकार्यांनी बोलण्यास टाळा टाळ केली . मात्र विरोधी पक्षाकडून सत्ताधारी भाजपवर सडकून टीका करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधीपक्षनेते राजू मिसाळ, माजी महापौर मंगला कदम, वैशाली घोडेकर, माजी विरोधीपक्षनेते नाना काटे, माजी स्थायी समिती अध्यक्ष अजित गव्हाणे उपस्थित होते.

संजोग वाघेरे म्हणाले, ‘‘भय आणि भ्रष्टाचार मुक्त पिंपरी-चिंचवड असे अभिवचन देऊन भाजप सत्तेत आली. किती पारदर्शक आणि भ्रष्ट कारभार आहे, हे या कारवाईवरून दिसून येते.

...Read More

V. S. News
सर्वसामान्य नागरिकांसाठी पुणे-लोणावळा लोकल सुरु, पण…

व्हिएस न्यूज - सर्वसामान्य पुणेकरांसाठी पुणे-लोणावळा लोकल सुरू करण्यात आली आहे. मात्र राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर 14 दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना स्थानिक प्रशासनाकडून परवानगी घ्यावी लागेल. त्यानंतर रेल्वेकडून तिकिट अथवा पास मिळेल, असे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

राज्य शासनाकडून सर्वसामान्य नागरिकांना लोकलमधून प्रवास करण्यास मुभा मिळाली आहे. मात्र कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊन चौदा दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना स्थानिक प्रशासनाकडून ओळखपत्र द्यावे लागेल. हे ओळखपत्र पुण्यामध्ये कोणाकडून दिले जाणार याबाबत मात्र रेल्वेकडून सांगण्यात आलेले नाही.

यापूर्वी अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना लोकलमधून प्रवास करण्यासाठी पुणे पोलिसांकडून क्यूआर कोड देण्यात येत होता. तो क्यूआर कोड रेल्वे स्टेशनवर दाखवल्यानंतर तिकिट अथवा पास दिला जात होता. मात्र आता सर्व नागरिकांसाठी लोकल सेवा सुरु झाली असल्याने नागरिकांना दोन्ही डोस नंतर 14 दिवस पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र स्थानिक प्रशासनाकडे देऊन त्यांच्याकडून ओळखपत्र घ्यावे लागेल.ते ओळखपत्र रेल्वेकडे द्यावे लागणार आहे.

त्यानुसार रेल्वेकडून नागरिकांना तिकिट अथवा पास दिला जाणार आहे. लोकल सेवा नागरिकांसाठी सुरू झाल्याचा आनंद असला तरी दोन्ही डोस झाल्यानंतर 14 दिवस पूर्ण झाल्याचे ओळखपत्र नेमके पोलीस की महापालिका यापैकी कोणाकडून घ्यायचे याबाबत मात्र साशंकता आहे.

राज्य शासनाकडून सर्वसामान्य नागरिकांना लोकलमधून प्रवास करण्यास मुभा मिळावी यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांनी मागणी केली होती. मुंबई प्रमाणेच पुणे- लोणावळा लोकल सेवा पूर्ववत सुरू व्हावी, यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी पाठपुरावा केला होता.

...Read More

V. S. News
भाजपा कामगार आघाडी पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष पदी नरेश जिनवाल यांची नियुक्ती.

व्हिएस न्युज- पिंपरी आणि भोसरी परिसरातील युवा कामगार नेता आणि सामाजिक कार्यकर्ते नरेश जिनवाल यांची भारतीय जनता पार्टी, कामगार आघाडी, पिंपरी चिंचवड शहर जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. हनुमंत लांडगे ( भाजपा, महाराष्ट्र प्रदेश,कामगार आघाडी, सोशल मीडिया प्रमुख/ सरचिटणीस) आणि प्रकाश मुगडे ( भारतीय जनता पार्टी,कामगार आघाडी, पिंपरी चिंचवड शहर जिल्हा अध्यक्ष )यांच्या हस्ते इतर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली.

सामाजिक कार्यकर्ता व कामगारांच्या न्याय हक्कासाठी नेहमी कटिबध्द असणारे नरेश जिनवाल यांनी माथाडी संघटनेच्या माध्यमातून अनेक कामगारांना न्याय आणि रोजगार उपलब्ध करून दिला आहे. अखिल भारतीय वाल्मिकी समाज पिंपरी चिंचवड शहर महासचिव पदी त्यांना निवडून दिले होते आणि त्या माध्यमातून अनेक सफाई कामगारांना मार्गदर्शन आणि त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम नरेश जिनवाल यांनी केले आहे.अशा विविध सामाजिक आणि कामगार क्षेत्रात कार्यरत असणा-या संस्था, संघटनांवर विविध पदांवर काम केले आहे.

नरेश जिनवाल यांनी सोशल मीडिया मार्फत आपला संपर्क क्रमांक ( 7219228866/9922877462) प्रसिद्ध करून पिंपरी चिंचवड परिसरातील कामगार वर्गाला कोणत्याही प्रकारच्या मदतीची गरज भासल्यास निसंकोच पणे संपर्क साधावा आणि त्यावर निस्वार्थीपणे सहकार्य केले जाईल असे आव्हान केले आहे.

"माझ्यावर जिवापाड प्रेम करणारा माझा कामगार वर्ग, मित्र परिवार आणि नागरिकांसह भाजपा पक्षश्रेष्ठी, आणि लोकप्रतिनिधींच्या अशिर्वादने माझी पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष, भा.ज.पा. (कामगार आघाडी) पदी नुकतीच निवड झाली, तुमच्या सारख्याच्या कृपाशिर्वाद, शुभेच्छा, सदिच्छामुळेच हे घडलं", असे म्हणत आभार मानले.

...Read More

V. S. News
मातोश्री सामाजिक संस्थेची कोकण पूरग्रस्त बांधवांना मदत आणि दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना वाहिली श्रद्धांजली.

व्हिएस न्युज - मुसळधार पावसामुळे तसेच दरड कोसळून अतोनात नुकसान झालेल्या कोकणातील महाड, तळीये, पोलदपूर, खारसगांव या पुरग्रस्त भागात जावून मातोश्री सामाजिक संस्थेच्या वतीने धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे कीट मदत म्हणून देण्यात आले.

यावेळी तळीये गावात दरड कोसळल्याने मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकून अनेक निष्पाप नागरीक मृत्यूमूखी पडले. त्या ठिकाणी दशक्रिय विधीच्या कार्यक्रमात मातोश्री सामाजिक संस्थेच्या वतीने श्रध्दांजली वाहण्यात आले.

यावेळी भावना व्यक्त करताना अध्यक्ष गणेश आहेर म्हणाले की, "या गावावर निसर्गाचा फार मोठा प्रकोप झाला आहे. यातून सावरण्यासाठी संबंध महाराष्ट्र या ग्रामस्थांच्या पाठीशी उभा आहे. मात्र या दुर्घटनेत जी जीवितहानी झाली. त्याचं दुःख कधीही भरून येणार नाही. तरीही आम्ही या मदतीच्या माध्यमातून एक छोटीशी सेवा करण्याचा प्रयत्न करीत आहोत".

पिंपरी चिंचवड मधील अनेक दानशूर व्यक्तींचा मदत पोहचवण्यात खारीचा वाटा आहे. या सेवेसाठी सहायक पोलिस निरीक्षक अन्सार शेख, गणेश आहेर, धनराजसिंग चौधरी, सुदर्शन देसले, विशाल वाली, सूशिल मल्ले, गणेश चाटणे, गोरख पाटील, गणेश पाडूळे, माऊली जाधव, बाळासाहेब गायकवाड, भरत इंगळे, प्रदिप दळवी, रविकिरण घटकार, डाॅ अभय कुलथे, विष्णू साळवे, दत्ता गिरी, अंकुश कोळेकर, महेश गुळगोंडा, मारूती म्हस्के, नरसिग माने, गणेश वाळुंज, अभय खामकर, सचिन साळवी, मंगल शिंगारे, नारायण खूशलानी, उमेश भायानी, लक्ष्मण, रामू चंयन्दास, सचिन छपरीबंद यांनी सहकार्य केले.

...Read More

V. S. News
पुणे-बंगळूर महामार्गावर ट्रकची सहा वाहनांना धडक, तिघांचा जागीच मृत्यू

व्हिएस न्यूज : पुणे बंगळूर महामार्गावर शिरवळ गावच्या हद्दीत भरधाव वेगातील ट्रकने सहा वाहनांना धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच गाडीतील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जण जखमी असल्याची माहिती समोर येते. मंगळवारी रात्री हा अपघात झाला.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की साताऱ्याहून पुण्याच्या दिशेला जात असताना भरधाव ट्रकने सहा गाड्यांना धडक दिली. यामध्ये दुधाचा ट्रक, मालट्रक, जीप, वॅगनार आणि आणखी दोन अशा सहा वाहनांना या भरधाव वेगातील ट्रकने धडक दिली. या अपघातात व्हॅगनार कारचा चक्काचूर झाला आहे तर इतर गडांची देखील प्रचंड नुकसान झाले आहे. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान अपघाताची घटना घडल्यानंतर महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्यासाठी पुढाकार घेतला. त्यातील जखमी नागरिकांना बाहेर काढत असताना तिघांचा जागीच मृत्यू झाल्याचे लक्षात आलं. अपघाताचा या घटनेमुळे परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.

...Read More

V. S. News
भा.ज.पा चे हनुमंत लांडगे यांची एक महिन्याची पेन्शन पूरग्रस्तांना मदतीसाठी..!

व्हिएस न्युज - कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्र पावसामुळे अनेक ठिकाणी विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. महापूर, भूस्खलनामुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागले. राज्याती स्वयंसेवी संस्थासह अनेक नागरिकांनी आपापल्या परीने आपत्तीग्रस्तांपर्यंत मदत पोहचवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

अशातच राज्यातील भारतीय जनता पार्टी ,कामगार आघाडी, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गणेश ताठे यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त मदत कार्यास खारीचा वाटा म्हणून भारतीय जनता पार्टी ,कामगार आघाडीचे, महाराष्ट्र प्रदेश ,सोशल मीडिया प्रमुख आणि सरचिटणीस हनुमंत लांडगे यांनी स्वतःची एक महिन्याची पेन्शन मदत म्हणून जाहीर केली आहे. सदर पेन्शनची रक्कम १ ऑगस्ट रोजी रोखस्वारुपत स्वाधीन करण्यात येणार आहे.

सेवा व मदत करण्यात नेहमीच तत्पर..

एक विचारशील कामगार नेता असलेल्या, हनुमंत लांडगे यांचा साधेपणा आणि मुक्त विचारसरणी यांवर विश्वास आहे. पारदर्शकतेला प्राथमिक महत्त्व देत, त्यांचा स्वभाव कायम आपल्या मातीशी जोडून राहण्याचा बनला आहे. एक खरा कामगार नेता सर्वंसमोर योग्य उदाहरण ठेवून नेतृत्व करतो. लांडगे यांचा स्वभाव अतिशय प्रेमळ आहे आणि जनतेच्या हितासाठी त्यांनी आपले कार्य समर्पित केले आहे. सर्व परिणामांचा विचार करुन काम करण्याचे धोरण ते अंमलात आणतात.तंत्रज्ञानाच्या युगात लोक डिजिटल माध्यमांद्वारे जोडले गेले आहेत. लांडगे यांनीही हे तंत्रज्ञान आत्मसात करून मोठ्या प्रमाणात समाजापर्यंत पोचण्यासाठी त्याचा उपयोग केला आहे.

...Read More

V. S. News
रेकी करून ज्वेलर्स शॉप, बँका फोडणाऱ्या नेपाळी टोळीच्या पाच सदस्यांना अटक; 12 लाखांचा मुद्देमाल जप्त

व्हिएस न्युज - रेकी करून ज्वेलर्स शॉप आणि बँका फोडणाऱ्या नेपाळी टोळीच्या पाच सदस्यांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने अटक केली आहे. या आरोपींकडून 12 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ज्या दुकानात चोरी करायची आहे, त्याच्या बाजूचे दुकान भाड्याने घ्यायचे आणि वेळ गाठून भिंत फोडून चोरी करण्याची या टोळीची पद्धत होती. बावधन येथे 18 जून रोजी एका ज्वेलर्सच्या दुकानात अशा प्रकारची चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

जगत बम शाही वय 28, रा. क्रिस्टल पैलेस, क्रिष्णा कॉलनी, मारुंजी पुणे. मुळ रा. गाव गटाडा, विनायक नगरपालिका, जि. अच्छम, नेपाळ), गणेश विष्णु शाही (वय 33, मूळ रा. गाव भुरुआ, लम्की टिकापुर रोड, जि. कैलासी, नेपाळ), खगेंद्र दोदी कामी (वय 27, मूळ रा. घाटगाऊ चौगुने गाव पालिका जि. सुरखेत नेपाळ), प्रेम रामसिंग टमाटा (वय 42, सध्या रा. पद्मालय पार्क, लंडन ब्रिज जवळ, पुनावळे, पुणे. मुळ रा. कालकांडा, विनायक नगरपालिका, जि. अच्छम, नेपाळ), रईस कादर खान वय 52, रा. तीन डोंगरी, प्रेम नगर, उन्नत नगर रोड क्र.2 साईबाबा मंदीर समोर, गोरेगाव (पश्चिम) मुंबई) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

बावधन मध्ये ज्वेलर्स शॉप फोडले

जगदंबा ज्वेलर्स, शॉप नं. 2, गीतांजली अपार्टमेंट, हुतात्मा चौक, बावधन बु. या शॉपच्या बाजूचे दुकान आरोपींनी 15 जून रोजी चायनीज व्यवसायासाठी भाड्याने घेतले. 18 जून रोजी सकाळी नेहमीप्रमाणे ज्वेलर्स दुकानदाराने दुकान उघडले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. चोरट्यांनी शेजारील चायनिज दुकानातून पोटमाळ्यावरील भिंतीला भगदाड पाडून आत प्रवेश करून गॅस कटरने तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु तिजोरी न फुटल्याने दुकानातील वर ठेवलेले चांदीचे दागिने, लॅपटॉप, मोबाईल फोन व सीसीटीही डीव्हीआर असा एकूण तीन लाख 55 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग

सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने तसेच गुन्ह्याची पद्धत वेगळी असल्याने पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी हा गुन्हा गुन्हे शाखा युनिट चारकडे वर्ग केला. पोलिसांनी घटनास्थळावरील, आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासत तांत्रिक सुरू केले.

नेपाळी व्यक्तीवर संशयाची सुई आली अन तपास पुढे सरकला

या गुन्ह्यात आजूबाजूच्या परिसरात काम करणारे नेपाळी वॉचमन सामिल असण्याची दाट शक्यता पोलिसांना वाटली. पोलिसांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणात मारुंजी परिसरात वॉचमन म्हणून काम करणारा एक इसम सदर गुन्ह्यात सामिल असल्याबाबत संशय आल्याने तसेच तो घटना झाल्यापासून काम सोडून गेल्याचे कळाल्याने त्याच्यावरील संशय बळावला. त्याच्याबाबत माहिती काढून पोलिसांनी जगत बम शाही याला अंबरनाथ येथून 12 जुलै रोजी अटक केली. त्याने त्याच्या तीन साथीदारांची नावे सांगितली. त्यानुसार पोलिसांनी गणेश, खगेंद्र, प्रेम या तिघांना ठाणे शहरातील वेगवेगळ्या ठिकाणावरून अटक केली. वरील आरोपींनी कार चालक अटक आरोपी रईस आणि फरार आरोपी शंकर चंद्र उर्फ कांचा लामा (रा. धनगढी नेपाळ), अर्जुन उर्फ ओम रावल रा. धनगढी, नेपाळ), बादल लामा (रा. धनगढी, नेपाळ), तसेच शंकर चंद्र उर्फ कांचा लामा याचे झारखंड येथून बोलावलेले तीन साथीदार यांनी केल्याचे पोलीस तपासात समोर आले.

अटक केलेल्या आरोपींकडून एक किलो 719 ग्रॅम चांदीचे दागिने, 11 ग्रॅम सोन्याचे दागिने, इनोव्हा कार, दुचाकी, मोबाईल फोन असा एकूण 12 लाख तीन हजार 940 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

चोरी करण्यापूर्वी आरोपी अशी करायचे रेकी

या प्रकरणात अटक आरोपी गणेश शाही व पाहिजे असलेला आरोपी शंकर चंद्र उर्फ कांचा लामा हे मुख्य सूत्रधार आहेत. त्यांनी चोरी करण्यासाठी सोनारा दुकानाशेजारील दुकान भाड्याने घेता येईल अशा बऱ्याच ठिकाणांची पाहणी केली. त्यापैकी सांगवी पोलीस स्टेशन हद्दीत एक आणि बावधन येथील एका सोनाराचे दुकान पाहून ठेवले होते. त्यानंतर आरोपींना 15 जून रोजी बावधन येथील ज्वेलर्सच्या दुकानाच्या बाजूचे दुकान भाड्याने मिळाले. लगेच आरोपींनी त्यांच्या साथीदारांना बोलावून घेतले आणि 17 जून रोजी रात्री भिंत फोडून चोरी केली.

हे प्रकरण शांत झाल्यावर ते काही दिवसांनी परत येवून सांगवी परिसरातील पाहून ठेवलेल्या दुकानात याच प्रकारे चोरी करण्याच्या विचारात होते. तसेच आरोपीकडे केलेल्या तपासात गणेश शाही व शंकरचंद्र लामा या दोघांनी त्यांच्या इतर साथीदारांसोबत 30 मे रोजी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे स्थानिक वॉचमनच्या मदतीने एका बँकेचे शटर कापून चोरी केल्याचे उघड झाले आहे.

सराईत अन चलाख आरोपी

या आरोपिंची मोठी टोळी आहे. या टोळीने यापूर्वी अशाच पद्धतीने अनेक गुन्हे केलेले आहेत. गणेश शाही याच्यावर घरफोडीचे व दरोड्याच्या प्रयत्नाचे एकूण 12 गुन्हे, प्रेम टमाटा याच्या विरुद्ध चार गुन्हे दाखल आहेत. पाहिजे आरोपी शंकरचंद्र लामा ऊर्फ कांचा याच्यावर एकूण पाच गुन्हे दाखल आहेत. तसेच सदर आरोपी हे अत्यंत चलाख असून ते आपसात बोलण्यासाठी नेहमी फेसबुक मॅसेंजरचा वापर करत होते. त्याद्वारे आरोपी एकमेकांना ऑडिओ व व्हिडिओ कॉल करत.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे, सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख, सिद्धनाथ बाबर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धर्मराज आवटे, दादा पवार, नारायण जाधव, पोलीस अंमलदार प्रविण दळे, संजय गवारे, अदिनाथ मिसाळ, राहिदास आडे, संतोष असवले, तुषार शेटे, लक्ष्मण आढारी, मो. गौस नदाफ, वासुदेव मुंडे, सुनिल गुट्टे, सुरेश जायभाये, प्रशांत सैद, तुषार काळे, अजिनाथ ओबासे, धनाजी शिंदे, सुखदेव गावंडे, गोविंद चव्हाण, आणि तांत्रिक विश्लेषन विभाग (गुन्हे शाखा) चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय तुंगार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पानमंद, राजेंद्र शेटे, नागेश माळी, विकास आवटे, पोपट हुलगे यांनी केली आहे.

...Read More

V. S. News
स्पाईनरोड, मोशी प्राधिकरण, संतनगर सेक्टर ४,६,९,११,१२ मधील पथारी, हातगाडी, टपारी धारक व रिक्षा, टेम्पो धारकांसाठी तीन दिवसीय करोना लसीकरण शिबिर आयोजित करावे - हनुमंत लांडगे

व्हिएस न्युज - स्पाईन रोड, संतनगर, मोशी प्राधिकरण सेक्टर ४, ६,९, ११ व १३ मधील ३० हजार नागरिकांच्या जीवितास धोका असणा-या ५०० पथारी, हातगाडी, टपारी धारक व रिक्षा, टेम्पो चालकांचे तातडीने कोरोना लसीकरण करावे, यासाठी पिंपरी चिंचवड मानगरपालिकेचे आयुक्त, आमदार, नगरसेवक यांना भारतीय जनता पार्टी (का. आ.) महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष हनुमंत लांडगे यांनी पत्राद्वारे मागणी केली आहे.

सदर पत्राची गंभीरपणे दखल घेऊन परिसरातील पथारी, हातगाडी, टपारी धारक व रिक्षा, टेम्पो चालक हे कोरोना विषाणूचे सुपर स्प्रडर ठरू शकतात व तशी सुरुवात देखील झाली आहे ही गंभीर बाब लक्षात घेता तीन दिवसीय कारोना लसीकरण शिबिर आयोजित करून तातडीने लसीकरण करावे अशी विनंती निवेदनाद्वारे पिंपरी चिंचवड मानगरपालिकेचे आयुक्त, आमदार व नगरसेवक यांना हनुमंत लांडगे यांनी केली आहे.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!